Akola Aam Aadmi Party upcoming local body elections in independent sakal
अकोला

अकाेला : आगामी निवडणुका ‘आप’ स्वबळावर लढविणार

प्रदेश प्रभारी दीपक सिंगला यांची माहिती, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक

सकाळ वृत्तसेवा

वाशीम : विधानसभा २०२४ ची रंगीत तालीम म्हणून पाहिल्या जात असलेल्या आगामी काळातील स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या मैदानात आम आदमी पार्टी स्वबळावर उतरणार असल्याची माहिती ''आप'' चे प्रदेश प्रभारी दीपक सिंगला यांनी दिली. आम आदमी पार्टीच्या कार्यकर्ता मेळाव्यानिमित्त १२ मे रोजी वाशीम येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली.

यावेळी संघटनमंत्री विजय कुंभारे, प्रदेश सचिव धनंजय शिंदे, विदर्भ संयोजक देवेंद्र वानखेडे, वाशीम जिल्हा संयोजक ॲड. मोरे, राम पाटील डोरले आदिंची प्रामुख्याने उपस्थिती होती. यावेळी अधिक माहिती देताना सिंगला म्हणाले की, आम आदमी पार्टीने दिल्ली पाठोपाठ पंजाब राज्यात स्वबळावर सत्ता मिळविली तर गोवा राज्यात यावेळी आम आदमी पार्टीचे राज्य संयोजक रंगाजी राचूरे, विधानसभा निवडणुकीत पक्षाचे दोन आमदार निवडून आले.

या निवडणुकांनंतर देशभरात भ्रष्टाचारमुक्त राजकीय पक्ष म्हणून ''आप'' हा एकमेव पक्ष असल्याची जनभावना बळावली आहे. राज्यातील नागरिकांसमोर ''आप'' एक सक्षम पर्याय म्हणून पुढे येत असल्याने कार्यकर्त्यामध्येही उत्साह संचारला आहे. नेते अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्त्वावर विश्वास ठेवून अनेक प्रस्थापित पक्षाचे नेते, कार्यकर्ते आम आदमी पक्षात प्रवेश करीत आहेत. या विजयानंतर महाराष्ट्रातील आम आदमी पार्टीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा विश्वास वाढला आहे.

त्यामुळे आगामी २०२४ विधानसभेची रंगीत तालीम म्हणून पाहिल्या जात असलेल्या राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका स्वबळावर लढविणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, आम आदमी पार्टीच्या कार्यकर्ता मेळाव्यात मान्यवरांच्या उपस्थितीत वाशीम जिल्ह्यातील शेकडो कार्यकर्त्यांनी पक्ष प्रवेश केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane News: संतापजनक! शाळेच्या टॉयलेटमध्ये रक्त दिसलं, मासिक पाळीच्या संशयातून मुलींना विवस्त्र केलं अन्...; ठाण्यातील प्रकारानं खळबळ

Video Viral: शुभमन गिलला समोरून जाताना पाहून काय होती सारा तेंडुलकरची रिऍक्शन? पाहा

Viral Video: धक्कादायक! लिफ्टमध्ये लहान मुलाला जबर मारहाण; ठाण्यातील संतापजनक घटना, घटनेचा व्हिडिओ व्हायरल

मराठी चित्रपटसृष्टीच्या मागण्यांबाबत राष्ट्रवादी सांस्कृतिक चित्रपट विभागाने घेतली सांस्कृतिक मंत्र्यांची भेट

धक्कादायक! एकाच कुटुंबातील चौघांचा जीव देण्याचा प्रयत्न, तिघांचा मृत्यू; घटनेमागचं कारण काय?

SCROLL FOR NEXT