akola plastic bag ban sakal
अकोला

अकोला : प्लास्टिक पिशवी, नायलॉन मांजा आढळल्यास कारवाई

जिल्ह्यात १ मेपासून काटेकोर अंमलबजावणी

सकाळ वृत्तसेवा

अकोला : जिल्ह्यात पर्यावरण संरक्षण राखण्याच्या दृष्टीने प्लास्टीक कचरा व्यवस्थापन, प्लास्टर ऑफ पॅरीस वापरास प्रतिबंध या आदेशांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी गाडगेबाबा सामाजिक प्रतिष्ठान अकोला या संस्थेची नियुक्ती करण्यात आली आहे. यासंदर्भात आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध करावयाच्या कारवाईचे स्वरुपही जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी गुरुवारी निर्गमित केले. येत्या ता.१ मेपासून या कायद्याची अंमलबजावणी जिल्ह्यात सुरू होईल, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

त्या दृष्‍टीने प्‍लास्‍टीक पिशव्‍या, नायलॉन मांजाचा वापर, प्‍लास्‍टर ऑफ पॅरीसचा वापर इ. मुळे प्राण्‍यांवर व पर्यावरणावर होणारे दुष्‍परिणाम इत्‍यादीवर केंद्र शासनाच्या प्राणी क्लेष प्रतिबंधक अधिनयम, १९६० मधील तरतूदींची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी अकोला जिल्‍ह्यामध्‍ये प्राणी क्लेष प्रतिबंधक समितीची जिल्‍हाधिकारी तथा जिल्‍हादंडाधिकारी यांचे अध्‍यक्षतेखाली स्‍थापना करण्‍यात आली आहे.

जिल्ह्यात ७५ मायक्रॉन पेक्षा कमी जाडीच्‍या प्‍लास्‍टीक पिशव्‍या, नायलॉन मांजाचा वापर, त्‍याच प्रमाणे प्‍लास्‍टर ऑफ पॅरीसच्‍या मूर्ती यांची आयात, साठवणूक, उत्पादन ,वितरण व विक्री आणि खरेदी/वापर करणाऱ्या प्रतिष्‍ठान, व्‍यक्‍ती इत्यादींवर कारवाई करण्यात येणार आहे. त्यासाठी गाडगेबाबा सामाजिक प्रतिष्‍ठान, अकबर प्‍लॉट, अकोट फैल, अकोला या संस्‍थेची नियुक्‍ती करण्‍यात आली आहे.

दर आठवड्याला अहवाल

उप आयुक्‍त, पशूसंवंर्धन अधिकारी अकोला यांनी केलेल्‍या कार्यवाहीचा अनुपालन अहवाल दर आठवड्याच्‍या शुक्रवारी सादर करावा लागणार आहे. प्रादेशिक अधिकारी, प्रदूषण नियंत्रण मंडळ अकोला यांनी जप्‍त करण्‍यात आलेल्‍या साहित्‍याची नियमानुसार विल्‍हेवाट लावावी. संबंधित तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी यांनी त्‍यांचे कार्यक्षेत्रामध्‍ये एसपीसीए यांचे प्रतिनिधी यांना आवश्‍यक ते सहकार्य करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

कुणाला करता येईल कारवाई?

एसपीसीए अंतर्गत नियुक्‍त केलेले प्रतिनिधी ज्‍यांचेजवळ कार्यालयाने निर्गमित केलेले ओळखपत्र आहे, अशा प्रतिनिधींना दंडनीय तसेच आवश्‍यक साहित्‍य जप्‍त करण्‍याची कारवाई करता येईल. दंडनीय तसेच साहित्‍य जप्‍त करण्‍याचे कारवाईत अडथळा नि‍र्माण केल्‍यास, संबंधीतांविरुध्‍द नियमानुसार फौजदारी कारवाई करण्‍यात येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

VIDEO : उत्तरप्रदेशात मराठी तरुणाला भोजपुरीत बोलण्यासाठी दमदाटी, भाषा येत नाही म्हटल्यावर....पाहा व्हिडीओ

Latest Maharashtra News Live Updates: नांदगावच्या दाम्पत्याला मिळाला पूजेचा मान, ग्रामस्थ आनंदीत

VIRAL VIDEO: दुध विक्रेता चक्क दुधात थुंकला, घटनेचा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल

Ashadhi Ekadashi : नाशिकच्या विठ्ठल मंदिरांत आषाढीला भक्तीचा झगमगाट

Crime News: हॉर्न वाजविल्याच्या किरकोळ कारणाने दोन गटांत हाणामारी; सूतगिरणी चौकातील घटना

SCROLL FOR NEXT