अकोला

अकोला; आणखी १८ रुग्णांचा मृत्यू, ४७६ नवे रुग्ण आढळले

आणखी १८ रुग्णांचा मृत्यू, ४७६ नवे रुग्ण आढळले

सकाळ वृत्तसेवा

अकोला ः कोरोना संसर्गामुळे (Corona infection) सोमवारी (ता. १०) आणखी १८ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यासोबतच ४७६ नवे रुग्ण आढळले. त्यामुळे मृतकांची संख्या ८१७ झाली असून सध्या जिल्ह्यात ६ हजार ४४७ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. Akola; Another 18 patients died and 476 new patients were found

कोरोना संसर्ग तपासणीचे सोमवारी (ता. १०) १ हजार ६२२ अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी १ हजार ३१३ अहवाल निगेटिव्ह तर ३०९ अहवाल आरटीपीसीआरच्या चाचणीत पॉझिटिव्ह आले. रॅपिडच्या चाचणीत १६७ अहवाल पॉझिटिव्ह आल्याने नव्या रुग्णांमध्ये ४७६ रुग्णांची भर पडली. आरटीपीसीआरच्या ३०९ पॉझिटिव्ह अहवालात ११८ महिला व १९१ पुरुषांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. मूर्तिजापूरमध्ये ३२, अकोट-१९, बाळापूर-०९, तेल्हारा-३०, बार्शीटाकळी-०८, पातूर-०८, अकोला ग्रामीण-९९, अकोला मनपा क्षेत्रात १०४ अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यासोबतच होम आयसोलेशन मधील ४३५ रुग्णांसह इतर रुग्णालयांमध्ये भरती ५७५ जणांना डिस्चार्ज सुद्धा देण्यात आला.

असे आहेत मृतक

कौलखेड येथील ६० वर्षीय महिला, दहिहांडा येथील ६५ वर्षीय महिला, मोठी उमरी येथील ७३ वर्षीय पुरुष, दहिहांडा येथील ७० वर्षीय पुरुष, अंबोदा ता. अकोट येथील ७४ वर्षीय पुरुष, मुंडगाव ता.अकोट येथील ४६ वर्षीय पुरुष, वर्धमान नगर येथील ५५ वर्षीय महिला, नंदखेड ता. अकोट येथील ७४ वर्षीय पुरुष, आश्रय नगर येथील ९६ वर्षीय महिला, अकोट येथील ४९ वर्षीय पुरुष, शरद नगर येथील ४९ वर्षीय पुरुष, कापसी ता. पातूर येथील ७४ वर्षीय पुरुष, अजनी ता. बार्शीटाकळी येथील ३६ वर्षीय पुरुष, अकोट फैल येथील ५० वर्षीय पुरुष, बापूनगर अकोट फैल येथील ३८ वर्षीय पुरुष, हरिहर पेठ येथील ८० वर्षीय पुरुष, तापडीया नगर येथील ४६ वर्षीय पुरुष, तसेच एकाचा खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. हा रुग्ण बाळापूर येथील ४१ वर्षीय पुरुष असून या रुग्णास 27 एप्रिल रोजी दाखल करण्यात आले होते.

कोरोनाची सद्यस्थिती

- एकूण पॉझिटिव्ह अहवाल - ४६२७६

- मयत - ८१७

- डिस्चार्ज - ३९०१२

- ॲक्टिव्ह रुग्ण - ६४४७

संपादन - विवेक मेतकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Who is Priya Nair: 92 वर्षांत पहिल्यांदाच महिला CEOची निवड; HULच्या नेतृत्वाची जबाबदारी प्रिया नायर यांच्यावर

Video: दिल्ली पुन्हा 100 वर्ष मागे गेल्यासारखी दुरवस्था! पावसानंतरचा व्हिडिओ पाहून तुम्हीही डोक्याला लावाल हात

Viral Video : काय चाललंय? धबधब्याखाली दोन मुले आक्षेपार्ह अवस्थेत, लोकांच्या माना लाजेने खाली, सार्वजनिक ठिकाण तरी सोडा रे...

Chakan MIDC : चाकण एमआयडीसी परिसरात वर्तुळाकार बससेवा, पीएमपी प्रशासनाचा निर्णय; अध्यक्षांकडून पाहणी

Vlogger of the Year: लोहार यांचा व्लॉगर ऑफ द इयर पुरस्काराने सन्मान

SCROLL FOR NEXT