BJP news esakal
अकोला

Akola : भाजप हा एकमेव पक्ष देशाला तारणारा

आ. रणधीर सावरकर : पातुरात सचिन ढोणेसह अनेकांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश

सकाळ वृत्तसेवा

पातूर : भाजप हा एकमेव पक्ष देशाला तारणारा असून, देश व देशाचा कारभार पाहण्यासाठी सक्षम आहे. याशिवाय कोणताही पक्ष देशाचे नेतृत्व करण्यास सक्षम नाही, त्यामुळे भाजप हा एकमेव पर्याय समजावा, असे प्रतिपादन अकोला पूर्वचे आमदार, भाजप जिल्हाध्यक्ष रणधीर सावरक यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात केले. ते ता. २१ ऑक्टोबर रोजी स्थानिक सावित्रीबाई फुले विद्यालयाच्या प्रांगणात आयोजित कार्यक्रमात बोलत होते.

पातूर येथील सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळचे अध्यक्ष, तसेच जैविक महासंघाचे जिल्हा सचिव व माजी नगरसेवक सचिन ढोणे यांच्यासह अनेक नागरिकांनी आमदार सावरकर यांच्या नेतृत्वावर विश्‍वास ठेऊन भाजपमध्ये प्रवेश केला. कार्यक्रमाला माजी आमदार बळीराम सिरस्कार, मनपा माजी सभापती जयंतराव मसने, जिल्हा उपाध्यक्ष शंकरराव वाकोडे, महादेवराव मानकर, तालुका अध्यक्ष रमण जैन, जिल्हा उपाध्यक्ष विजयसिंह गहिलोत, तालुका सरचिटणीस राजू उगले, कपिल खरप, जिल्हा सचिव प्रेमानंद श्रीरामे, जिल्हा सचिव चंद्रकांत अंधारे, भिकाजी धोत्रे, शहराध्यक्ष अभिजीत गहिलोत यांच्या प्रमुख उपस्थितीत होते.

वसुबारसनिमित्ताने मान्यवरांच्या हस्ते गाय व वासराचे पूजन करून ‘सकाळ’च्या अभियानात सहभागी झाले.यावेळी सचिन ढोणे यांनी आ.सावरकर यांचा शाल-श्रीफळ देऊन सत्कार केला. ढोणेंसह प्रशांत म्हैसणे, निखील नीलखण, सुनील पाटील, विशाल कुटे, प्रभुदास बोंबटकर, नवीन करंगळे, पुरुषोत्तम भगत, संजय आवटे, महिंद्र ढोणे, दादाराव ढोणे, नवीन पेंढारकर, अक्षय बगळेकर, धीरज बोळे, प्रीया कोथळकर, कल्पना म्हैसणे, संतोष बगळेकर, सचिन तायडे पक्षप्रवेश केला.

यावेळी समाजसेवक विजय काळपांडे, गुलाबराव गाडगे, राजाराम देवकर, डॉ.सुनील आवटे, विनेश चव्हाण, मंगेश केकान, ज्ञानेश्वर जाधव, संजय उजाळे, रणजीत देशमुख, विठ्ठल लोथे, गोपाल गालट, अंकुश राठोड, गोपाल चतरकर, श्रीकांत बराटे, गजानन गुजर, बाळू गोतरकार, विष्णू शेलारकर, दिलीप बगाडे, गिरी गुरुजी यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी मान्यवरांच्या हस्ते येथील खडकेश्वर गणेश उत्सव मंडळाने महाराष्ट्र शासनाने आयोजित केलेल्या उत्कृष्ट सार्वजनिक गणेश उत्सव पुरस्कारात राज्यातून प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल कार्यकर्त्यांचे व वरिष्ठ मंडळींचे स्वागत केले. सूत्रसंचालन प्रल्हादराव निळकंठ यांनी केले, तर आभार सुनील राखोंडे यांनी मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane News: ठाण्यात उभी राहणार ग्रीनवॉल! पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्ष प्राधिकरण विभागाचा निर्णय

Mumbai News: नागरिकांची वाहतूक कोंडीतून होणार सुटका, वेसावे ते भाईंदर कोस्टल रोडच्या कामाला वेग

Latest Maharashtra News Live Updates: मराठीत बोललो तर माध्यम माझी भावना सर्व महाराष्ट्रातील लोकांना लाईव्ह दाखवतील - फडणवीस

Thane Politics: मराठीचा मुद्दा चिघळला; मनसे महिला पदाधिकाऱ्याला जीवे मारण्याची धमकी

M Phil Professors : १४२१ प्राध्यापकांना मिळाला दिलासा! एम. फिल धारक प्राध्यापकांना अखेर नेट/सेटमधून सूट

SCROLL FOR NEXT