Akola bogus seed case: Court case filed against two companies, soybean seed uncertified case of six big companies 
अकोला

बोगस बियाणे प्रकरणी दोन कंपन्यांवर ‘कोर्ट केस’ दाखल, सहा बड्या कंपन्यांचे सोयाबीन बियाणे अप्रमाणित प्रकरण

सुगत खाडे

अकोला  ः वेगवेगळ्या जाहिरातींच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या माथी सोयाबीनचे बोगस बियाणे मारणाऱ्या दोन कंपन्यांविरोधात मूर्तिजापूर न्यायालयात शुक्रवारी (ता. ३१) कोर्ट केस दाखल करण्यात आली. त्यामध्ये मे. सारस ॲग्रो इंडस्ट्रीज व मे. प्रगती अग्रो सर्विसेस या दोन कंपन्याचा सहभाग आहे. सोयाबीनचे बियाणे उगवण क्षमतेत फेल (अप्रमाणित) आल्यामुळे संबंधित कंपन्यांविरोधात सदर कारवाई करण्यात आली.

यावर्षी खरीप हंगात शेतकऱ्यांनी मोठ्या उमेदीने सोयाबीचे बियाणे पेरले. पेरण्या आटोपल्यानंतर पाऊस सुद्धा झाला. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. परंतु शेतकऱ्यांनी पेरलेले सोयाबीनचे बियाणेच बोगस निघाल्यामुळे शेतकरी बोगस बियाण्यांच्या दुष्टचक्रात सापडले.

त्यामुळे शेकडो एकरवरील पेरण्या सुद्धा उलटल्या. दरम्यान हा सर्व प्रकार झाल्यानंतर जुलैमहिन्यात महाबीजसह सहा बड्या कंपन्यांचे बियाणे उगवण क्षमतेत अप्रमाणित निघाल्याचा ठपका बियाणे गुणवत्ता परिक्षण प्रयोगशाळांनी ठेवला. त्यामुळे संबंधित सहा बियाणे कंपन्यांना जिल्हा परिषदेच्या कृषी विभागामार्फत नोटीस जारी करण्यात आली. त्यापैकी दोन कंपन्यांनी दिलेले खुलासे योग्य नसल्यामुळे कृषी विभागाने संबंधित मे. सारस ॲग्रो इंडस्ट्रीज व मे. प्रगती अग्रो सर्विसेस विरुद्ध मूर्तिजापूर न्यायालयात खटला दाखल केला. मूर्तिजापूर येथून सदर कंपन्यांचे बियाणे नमूने घेण्यात आले होते. त्यामुळे सदर प्रक्रिया मूर्तिजापूर पंचायत समितीचे कृषी अधिकारी तिजारे यांनी पार पाडली.
 
इतर कंपन्यासुद्धा ‘रडार’वर
अप्रमाणित सोयाबीन बियाणे प्रकरणी दोन कंपन्यांविरोधात कोर्ट केस दाखल करण्यात आली आहे. परंतु
वरदान बायोटेक, बुस्टर प्लॅन्ट जेनेटीक, महाबीज, केडीएम सिड्‌स इत्यादी कंपन्यांचे सोयाबीनचे जेएस ३३५ चे वाण सुद्धा प्रयोगशाळेत अप्रमाणित आढल्यामुळे त्यांच्यावर सुद्धा अशीच कारवाई करण्यात येईल, अशी माहिती कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
 
सोयाबीन बियाणे अप्रमाणित प्रकरणी दोन कंपन्यांविरोधात न्यायालयात खटले दाखल करण्यात आले आहेत. इतर कंपन्यांविरोधात सुद्धा लवकरच पुढील कार्यवाही करण्यात येईल.
- मुरलीधर इंगळे, कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद, अकोला
(संपादन - विवेक मेतकर)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सोलापूरमध्ये मोठा ट्विस्ट! काँग्रेसने तिकीट दिल्यानंतर महिला उमेदवारांचा MIM मध्ये प्रवेश, काय दिलं कारण?

SA20: बापरे... क्रिकेट चाहत्याने पकडला तब्बल १.०८ कोटींचा कॅच! T20 सामन्यातील Video होतोय व्हायरल

'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्रीच्या सुनेला अटक, दीड कोटीची खंडणी घेताना रंगेहात पकडलं

Latest Marathi News Live Update : बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचारांच्या निषेधार्थ वाशिममध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचे निदर्शनं

Jagannath Patil: कॅमेरा बंद कर, नाही तर फेकून देईल, भाजपाचे माजी मंत्री पत्रकारांवर संतापले

SCROLL FOR NEXT