Akola Buldana Marathi News husband and wife quarreled over eggs 
अकोला

पोलीसही चक्रावले, नवरा-बायकोत अंड्यावरुन झालं कडाक्याचं भांडण शेवटी अंड्यामुळे मिटलं

सकाळ वृत्तसेवा

बुलडाणा : बुलढाण्यातल्या एका नवरा-बायकोमध्ये कडाक्याचं भांडण झालं... आता यात काय नवल, असं तुम्ही म्हणाल...

तर या भांडणांचं कारण ठरली ती कोंबडीची अंडी.... हे भांडण एवढं वाढलं, एवढं विकोपाला गेलं की, प्रकरण पोलीस स्टेशनपर्यंत पोहोचलं. बुलढाण्यातला अंडे का झगडा सध्या चर्चेत आहे.

संडे हो या मंडे, रोज खाओ अंडे... कारण अंडी शरीरासाठी पोषक असतात. पण याच अंड्यावरून बुलढाण्यात साखरखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोठं महाभारत घडलं... त्यांचं झालं असं की, एक नवरा घरी दोन अंडी घेऊन आला. त्यानं बायकोला अंड्याची भाजी बनवायला सांगितली. 

नवऱ्याला अंड्याची भाजी करून देण्याऐवजी बायकोनं ती अंडी मुलीला खाऊ घातली. मग काय, नवरोबांचा राग अनावर झाला... आणि दोघांमध्ये कडाक्याचं भांडण झालं. वाद एवढा वाढला की प्रकरण पोलीस स्टेशनमध्ये पोहोचलं.

अंड्यावरून सुरू झालेलं हे नवरा बायकोचं भांडण ऐकून पोलिसांनी डोक्याला हातच लावला. हा विचित्र तंटा कसा मिटवायचा, मोठा पेचच होता... पण पोलिसांनी अफलातून अंडे का फंडा शोधला.

पोलीसांनी दोघांचं म्हणणं शांतपणे ऐकून घेतलं. दोघांची वेगवेगळी बाजू होती. अंड हेच भांडणामागचं कारण आहे हे त्यानंतर पोलिसांना स्पष्ट झालं. त्यानंतर पोलिसांनी स्वत:कडून दोन अंडी देत दोघांचं भांडण मिटवलं. दोघेही आनंदाने अंडी हातात घेऊन घरी गेले. 

अंडी आणि त्यावरून झालेलं अनोखं भांडण आणि पोलिसांनी शोधलेली अफलातून आयडिया.. पुढच्या वेळी घरात अंडी आणाल, तेव्हा हा किस्सा आठवून हसू आल्याशिवाय राहणार नाही.

(संपादन - विवेक मेतकर)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur Crime : भाजप नगरसेविकेच्या पतीवर प्राणघातक हल्ला; गंभीर जखमी, संतप्त कार्यकर्त्यांची रुग्णालयासमोर गर्दी

Pune Drone Cluster: पुण्यात ड्रोन अन् खाद्यप्रक्रिया क्लस्टर; राज्यातील पहिलाच उपक्रम, भोसरी, हडपसरमध्ये सुरू होणार प्रकल्प!

Pandharpur News: पंढरपुरातील प्रस्तावित कॉरिडॉरला तीव्र विरोध; सुब्रह्मण्यम स्वामींच्या मोहिमेस पाठिंबा देण्यासाठी बाधितांचा शंखनाद!

Latest Marathi News Update: काँग्रेस भवनात दगडफेक प्रकरणी १०० पेक्षा जास्त जणांवर गुन्हा

Solapur News: भारताच्या दणदणीत विजयानंतर सोलापुरात जल्लोष; पाकिस्‍तानला लाेळविताच आतषबाजी, पेढे वाटून, तिरंगा उंचावून आनंदोत्सव साजरा!

SCROLL FOR NEXT