Covid Vaccine Sakal
अकोला

अकोला : कोविड लसीकरणास नागरिकांनी भरघोस प्रतिसाद द्यावा!

जिल्हाधिकारी निमा अरोरा यांचे आवाहन

सकाळ वृत्तसेवा

अकोला ः कोविड लसीकरणाचे लसीकरणासाठी ‘हर घर दस्तक’, ही मोहीम सुरू करण्यात आली असून, मोहिमेला नागरिकांनी प्रतिसाद द्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी केले आहे. यासंदर्भात मंगळवारी (ता. १६) जिल्हा टास्क फोर्स समितीच्या बैठकीत त्यांनी यंत्रणांना अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्याचे निर्देश दिले.

जिल्हा टास्क फोर्स समितीच्या बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वंदना वसो-पटोकार, तसेच सर्व तालुका आरोग्य अधिकारी आदी उपस्थित होते. यावेळी माहिती देण्यात आली गत १० तारखेपासून लसीकरणाची विशेष मोहीम सुरु झाली असून लसीकरणाला नागरिकांचा प्रतिसादही मिळत आहे.

गत पाच दिवसांत पहिला डोस घेतलेल्या व्यक्तींचे प्रमाण आता ५९ टक्के झाले असून दोन्ही डोस घेतलेल्या लोकांचे प्रमाण २७.२१ टक्के आहे. लोकांना लसीकरणाचे फायदे समजावणे, लोकांना आवाहन करणे, त्यासाठी प्रत्यक्ष कॉल करणे इत्यादी उपाययोजनांसोबत रेडिओ व अन्य माध्यमांद्वारे जनजागृती करणे या उपायांचा अवलंब जनजागृतीसाठी करण्यात येत आहे.

ग्रामपातळीवर तसेच शहरातही स्थानीक यंत्रणांना अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचून त्यांना लसीकरणाचे फायदे समजावून सांगावे, असे निर्देश अरोरा यांनी दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dabholkar Murder Case : नरेंद्र दाभोलकर हत्याकांडात मोठी अपडेट ! शरद कळसकरला हायकोर्टाकडून जामीन मंजूर

कोलंबियातील ८० हिप्पो वनतारामध्ये आणणार, अनंत अंबानींचा सरकारकडे प्रस्ताव

1250 Range EV : एका चार्जवर मुंबई ते दिल्ली! 'या' कारने मार्केटमध्ये उडवली खळबळ; ९५५ हॉर्सपॉवरसह १२५० किमी रेंज, किंमत...

Latest Marathi News Live Update: बंगाल निवडणुकीत भाजपला मदत करण्यासाठी केंद्रीय दले कार्यरत: मतदान केल्यानंतर ममता यांचे विधान

Jamgaon News: डीजेच्या आवाजाने घाबरून पळालेल्या 27 बकऱ्या मॉर्निंग वॉककरांनी शोधून मालकाकडे सुपूर्द

SCROLL FOR NEXT