crop loan sakal
अकोला

अकोला : पीक विम्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे आंदोलन

शुक्रवारी पीक विमा कंपनीच्या कार्यालयात ठीय्या आंदोलन करण्यात आले.

सकाळ वृत्तसेवा

अकोला : अकोट व तेल्हारा तालुक्यासह जिल्ह्यातील सर्व ५२ मंडळातील शेतकऱ्यांना सरसकट पीक विमा देण्यात यावा, या मागणीसह इतर मागण्यांसाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शिवा मोहोड यांच्या नेतृत्वात शुक्रवारी पीक विमा कंपनीच्या कार्यालयात ठीय्या आंदोलन करण्यात आले.

जिल्ह्यातील सर्व ५२ मंडळात पीक विमा लागू करून तो सरसकट पद्धतीने देण्यात यावा. पीक विम्याचे पैसे टप्प्याने न देता एक रकमी देण्यात यावे. ऑनलाइन सर्वे झालेला विमा लवकर मंजूर करावा. मंजूर झालेल्या विम्याचे पैसे लवकरात लवकर द्यावे. अकोट तालुक्यात विमा कंपनीच्या प्रतिनिधिंनी सर्वे करण्यासाठी शेतकऱ्यांकडून पैसे घेतल्याचे आरोप आहेत. त्याची चौकशी होऊन कारवाई व्हावी अशा मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे यांच्या मार्गदर्शनात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शिवा मोहोड यांच्या नेतृत्वात रिंग रोडवरील पीक विमा कंपनीच्या कार्यालयात आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनानंतर पीक विमा प्रतिनिधींनी या सर्व मागण्यांचा लवकरात लवकर विचार करण्यात येईल, असे आश्वासन दिले. या आंदोलनात सचिन बोनगिरे, किरण ठाकरे, गणेश महल्ले, गणेश कुकडे, अमोल क्षिरसागर, हर्षल ठाकरे, श्रीकांत साबळे, गौरव गावंडे, कैलास अवताडे, आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Data Leaked: HDFC बँकेत खळबळ! गोपनीय माहिती बाहेर कशी गेली?

SA vs AUS 2nd Test : दक्षिण आफ्रिकेने 'फास' आवळला! रबाडाच्या 154.5 kph वेगाच्या चेंडूने हेड हडबडला... यान्सेनने करेक्ट कार्यक्रम केला

“ कधी-कधी बाबांना स्टेशनवर झोपायला लागायचं” ललित प्रभाकर बालपणीच्या आठवण सांगताना म्हणाला, 'वन रुम किचनमध्ये बाथरूम, मोरी'

Latest Marathi News Live Update : टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणी आणखी एकाला अटक, गुजरातमधून पोलिसांनी घेतलं ताब्यात

Anushka Gurav Success Story : अंगणवाडी सेविकेची लेक थेट अमेरिकेत! मसूरच्या अनुष्का गुरवची आंतरराष्ट्रीय कंपनीत 'सॉफ्टवेअर इंजिनिअर' म्हणून निवड, सिस्को कंपनीत मिळवले मोठे पॅकेज

SCROLL FOR NEXT