Crime  sakal
अकोला

गृहकलहातून मुलीने, चुलत भावाच्या मदतीने केला बापाचा खुन

शहरातील मुक्ताई नगर रोडवरील सुभाषचंद्र बोस नगरमध्ये पोटच्या मुलीने, चुलत भावाच्या मदतीने गृहकलहातून बापाचा निर्घृण खून केल्याची घटना (ता.८) रात्री घडली.

सकाळ वृत्तसेवा

मलकापूर (जि. बुलडाणा) : शहरातील मुक्ताई नगर रोडवरील सुभाषचंद्र बोस नगरमध्ये पोटच्या मुलीने, चुलत भावाच्या मदतीने गृहकलहातून बापाचा निर्घृण खून केल्याची घटना (ता.८) रात्री घडली. याबाबतची फिर्याद मृतकाच्या मुलीने शहर पोलिस स्टेशनला दिली आहे.

माझी मोठी बहीण लक्ष्मी रावणचवरे हिचे तीन वेळा लग्न झाले असून सासरी पटत नसल्याने ती माहेरीच राहत होती व (ता.८) रात्री ८ वाजेदरम्यान मी सासरी जाणार नसून, माहेरीच राहणार असल्याचे तिने वडील गुलाब रावणचवरे यांना सांगितले. पण आमची बदनामी होईल अजून तुझ्या दोन्ही बहिणींचे लग्न राहिले असून तू इथे न राहता सासरी रहा किंवा कोठेही रहा असे वडिलांनी तिला समजावून सांगितले.

मात्र, मी इथेच राहणार असे म्हणून तिने वडीलांशी वाद घातला. लक्ष्मी व तिच्या सोबत आलेला चुलत भाऊ प्रकाश साहेबराव रावणचवरे या दोघांनी वडिलांच्या छातीवर धारदार चाकूने सपासप वार करुन त्यांना ठार मारले, अशी फिर्याद वैष्णवी गुलाब रावणचवरे हिने शहर पोलिस स्टेशनला दिल्यावरुन पोलिस निरीक्षक प्रल्हाद काटकर यांनी ए.पी.आय सुखदेव भोरकडे, पो.उप.नि. विश्वजीत ठाकूर, पो. उप. नि. रतनसिंह बोराडे, पोलिस ताफ्यासह घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी दोघा आरोपींना ताब्यात घेतले असून पुढील तपास पो.उप.नि. रतनसिंह बोराडे करीत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI, 1st T20I: कॅप्टन श्रेयस अय्यरचं वादळी शतक! भारताचा वेस्ट इंडिजवर ३२ चेंडू राखून दणदणीत विजय, मालिकेत आघाडी

MPSC Student Agitation : अध्यक्षांच्या राजीनाम्यावर आंदोलक ठाम; विद्यार्थ्यांच्या स्वप्नांची काढली प्रतीकात्मक अंत्ययात्रा

Pune Crime : कसबा मंदिरातील दानपेटी फोडली! मध्यरात्री मंदिराचे कुलूप तोडून ६० हजारांची रोकड लंपास; आरोपीला अटक

IND A vs AUS A, 1st ODI: पाटीदार लढला, पण बाकी सारे ढेपाळले; भारताचा संघ १४९ वर ऑलआऊट, ऑस्ट्रेलियाचा मोठा विजय

India New Captain: भारतीय महिला संघाला मिळाली नवी कर्णधार! BCCI ने जाहीर केले ODI अन् T20I संघ, हरमनप्रीतला मिळाली जागा?

SCROLL FOR NEXT