akola  sakal
अकोला

Akola : पीक विम्याची रक्कम जमा; उपोषण स्थगित

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत देण्यात यावी, जिल्हा दुष्काळ जाहीर करावा,

सकाळ वृत्तसेवा

अकोला - शेतकऱ्यांच्या प्रश्नावर अन्नत्याग आंदोलन करीत असलेले शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गोपाल दातकर यांच्या मागण्या प्रशासनाने मान्य केल्याने गुरुवारी सायंकाळी त्यांनी उपोषण स्थगित केले. त्यापूर्वी अकोला आणि पातूर येथे आंदोलकांनी पीक विमा कार्यालयाची तोडफोड केली होती.

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत देण्यात यावी, जिल्हा दुष्काळ जाहीर करावा, या मागणीसाठी शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून मंगळवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमाेर उपाेषण सुरू केले होते. जिल्ह्यातील ५२ महसूल मंडळांपैकी ३४ मंडळे अतिवृष्टीत बाधित झाली. अन्य मंडळांमध्येही अतिवृष्टी आणि पुराच्या जबर तडाख्याने शेतकऱ्यांच्या शेतातील पीक जमीनदोस्त झाल्याने खरीप हंगामाच्या प्रारंभीच शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला.

१ लाख ६८ हजार ९३७.१ हेक्टरवरील शेतीचे नुकसान झाले हाेते. अतिवृष्टीमुळे झालेल्या पीक व शेत जमिनीच्या नुकसान भरपाईसाठी शासनाने १६४ काेटींची मदत मंजूर केली. मात्र रब्बी हंगाम सुरू झाल्यानंतरही शेतकऱ्यांना खरीप हंगामातील नुकसानाचा मदत मिळालेली नाही. या नुकसान भरपाईसह शेतकऱ्यांच्या अन्य मागण्यांसाठी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा जि.प. गटनेते गाेपाल दातकर यांनी उपोषण सुरू केले होते.

त्यांच्या मागणीनुसार पीक विम्याची २५ टक्के रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणे सुरू झाली आहे. महावितरणकडून रोहित्र दुरुस्तीबाबत लेखी आश्वासन देण्यात आले. मागील वर्षीच्या पीक विम्याबाबत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी कंपनीविरोधात अपिल करावे, ही मागणीही मान्य करण्यात आली. त्यामुळे गुरुवारी सायंकाळी दातकर यांनी उपोषण स्थगित केले. त्यांच्यासोबत दहा शिवसैनिक व जि.प. सदस्यांनीही उपोषण सोडविले. उपोषण सोडविताना माजी आमदार गजानन दाळू गुरूजी, माजी आमदार संजय गावंडे आणि अकोला तहसीलदार पवन पाटील यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अमेरिकेत १० वर्षात किती गोळीबाराच्या घटना घडल्या? प्रश्नावर उत्तर देताच थेट गळ्यावर झाडली गोळी; चार्ली किर्क यांची हत्या

Nepal Protest : नेपाळमधील विमानसेवा पुन्हा सुरू, एयर इंडियाची पहिली फ्लाईट दिल्लीसाठी रवाना

Mehbooba Mufti: मेहराज मलिक यांना सोडा : मेहबूबा मुफ्ती; लक्ष विचलित करण्यासाठीच अटक केल्याचा आरोप

Oats Beetroot Dosa Recipe: ओट्स अन् बीटचा डोसा खाल्लाय? सकाळी नाश्त्यात झटपट होणारी रेसिपी जाणून घ्या

माेठी बातमी! 'राज्य शासनाकडून सोलापूर जिल्ह्यातील ५८ गावे पुन्हा वाऱ्यावर'; हैदराबाद गॅझेटिअरमधील नोंदी, प्रशिक्षण फक्त मराठवाड्यातील ग्राम समितीलाच

SCROLL FOR NEXT