The Akola District Collector's Office has been reviewing the growing prevalence of corona in the warroom 
अकोला

खासगी रुग्णालयांकडून कोविड रुग्णांची लूट; वार रुमच्या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी दिले कारवाईचे आदेश

सकाळ वृत्तसेवा

अकोला : जिल्ह्यामध्ये कोविड संसर्गाचा प्रार्दुभाव सातत्याने वाढत आहे. साहजिकच शासकीय रुग्णालय व प्रशासनातर्फे करण्यात आलेल्या सुविधांवर त्याचा ताण पडत असल्याने संसर्ग झालेले रुग्ण खासगी रुग्णालयाचा आधार घेत आहेत. मात्र येथे रुग्णांची व त्यांच्या नातेवाईकांच्या परिस्थितीचा गैरफायदा घेवून खासगी रुग्णालयातर्फे उपचारासाठी निर्धारित दरापेक्षा अधिक रक्कम उकळली जात असल्याच्या तक्रारी जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त झाल्यात. त्यामुळे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी अशा रुग्णालयावर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोनाचा वाढता प्रार्दुभावबाबत वाररुममध्ये आढावा घेण्यात आला. यावेळी रुग्णांकडून प्राप्त जादा दर आकारणीबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी आरोग्य विभागाला कठोर कारवाईसंदर्भात निर्देश दिले. यावेळी जिल्हा शल्य चिकीत्सक राजकुमार चव्हाण, मनपाचे प्रभारी आयुक्त पंकज जावळे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉ. नितीन आंभोरे, उपविभागीय अधिकारी डॉ. निलेश अपार, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधीक्षक डॉ. श्यामकुमार सिरसाम, मनपा वैद्यकीया अधिकारी डॉ. अस्मिता पाठक, माता व बालसंगोपन अधिकारी डॉ. मनिष शर्मा आदी उपस्थित होते. कोरोना संसर्ग झालेल्या तसेच कोविडमुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या संपर्कातील व्यक्तीचा शोध घेवून कोविड चाचण्या वाढविण्याची सूचनाही यावेळी जिल्हाधिकारी यांनी दिली.

संचारबंदीतही गर्दी

जिल्ह्यात लागू करण्यात आलेले संचारबंदीचे सक्तीने पालन होताना दिसत नाही. संचारबंदीच्या काळतही रस्‍त्यांवर गर्दी होताना दिसते. नागरिकांनी कुठेही गर्दी करू नये, याबाबत उपाययोजना करण्यासंदर्भात संबंधितांना आदेश दिले.

स्वतंत्र व्यवस्था असेल तरच घरी राहण्याची परवानगी

प्रत्येक कोरोना रुग्णांनी आधार कार्ड किंवा रेशन कार्ड सोबत आणणे अनिवार्य असल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले. यासोबतच होम आयसोलेशनमधील रुग्णांना शिक्के मारणे, होमआयसोलेशनमध्ये असलेल्या रुग्णांकरिता स्वतंत्र्य व्यवस्था असल्याचे खातरजमा करावी. स्वतंत्र व्यवस्था असेल तरच घरी राहून उपचार घेण्याची परवानगी देण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. होमआयसोलेशन नियमाचे पालन न करणाऱ्या व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करण्याबाबतही आदेशित केले.

नोंदणीकरूनच लसिकरण केंद्रावर जा !

सामाजिक अंतर, मास्क लावणे व साबणाने हात स्वच्छ करणे या त्रिसूत्रीय नियमाचे नागरिकांनी काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे. लसीकरणाच्या ठिकाणी गर्दी होताना दिसत आहे. ही गर्दी टाळण्यासाठी कोविन ॲपवर नोंदणी केल्यानंतरह वेळ निश्चित करुनच लसीकरण केंद्रावर जावे, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Russian Woman: रशियन महिला सापडली ते गोकर्णचं घनदाट जंगल... माणूस हरवला की रस्ता ही सापडणार नाही, फोटो पाहा

रशियन महिलेच्या मुलींचे वडील कोण? भारतात का आली होती? मोठे अपडेट समोर

Latest Maharashtra News Updates : पंचगंगा नदीची पाणी पातळी चोवीस तासांत सहा फूट सहा इंचांनी वाढली

Local Elections 2025 : नेत्यांचे आरोप-प्रत्यारोप, इच्छुकांचा अभ्यास, जिल्हा परिषद गट-गण प्रारूप रचना; निवडणूक मोर्चेबांधणीला सुरुवात

Kolhapur Chappal Prada : ‘प्राडा’ची टेक्निकल टीम कोल्हापुरी पायतान बघून भारावली, कारागिरांची हस्तकला पाहून म्हणाले...

SCROLL FOR NEXT