crime news sakal
अकोला

अकोला जिल्ह्यातील ७५ वा गुन्हेगार स्थानबद्ध

गुन्हेगारास एक वर्षाकरिता जिल्हा कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे

सकाळ वृत्तसेवा

अकोला : डाबकी रोड रेणुकानगर परिसरातील कुख्यात गुंड संदिप उर्फ सॅन्डी त्रंबक भांडे (३०) याला महाराष्ट्र महाराष्ट्र झोपडपट्टी गुंड (एमपीडीए) कायद्यांतर्गंत एक वर्षाकरिता जिल्हा कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे. पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांनी जिल्हाचा पदभार स्वीकारल्यापासून एमपीडीए अंतर्गत करण्यात आलेली ही ७५ वी कारवाई ठरली आहे.

भांडवर यापूर्वी दंगा करणे, गैरकायद्याची मंडळी जमा करणे, गभीर दुखापत करणे, अश्लिल शिवीगाळ करणे, सामान्य लोकांचे ररस्ता अडवून त्यांना शिवीगाळ करणे, अवैद्यरित्या शस्त्र बाळगणे, शासकीय आदेशाचे उल्लंघन करणे, अवैधरित्या शस्त्र बाळगणे, लोकसेवक आपले कर्तव्यपार पाडत असताना त्यांचे कामात अडथळा करून त्यांचेवर हल्ला करून शिवीगाळ व जिवे मारण्याची धमकी, दुखापत करणे असे बरेच गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याचे वर यापूर्वी विविध कलमान्वये प्रतिबंधक कारवाई करण्यात आली होती.

परंतु तो प्रतिबंधक कारवाई करूनसुध्दा जुमानत नसल्याने त्याचे विरूध्द गंभीर दखल घेण्यात येवुन त्याच्या गुन्हेगारी वृत्तीस आळा बसावा याकरिता पोलिस अधीक्षकांनी त्यास स्थानबध्द करण्याबाबतचा प्रस्ताव जिल्हादंडाधिकारी, अकोला यांना सादर केला होता. जिल्हादंडाधिकारी, नीमा अरोरा यांनी सर्व कायदेशीर बाबींची पडताळणी करून त्यास एक वर्षाकरिता अकोला जिल्हा कारागृहात स्थानबध्द ठेवण्याबाबतचा आदेश ता. २९ जुलै २०२२ रोजी पारीत केला.

संदिप उर्फ सॅन्डी त्रंबक भांडे याचा तत्काळ शोध घेवून त्यास ता. ३१ जुलै २०२२ रोजी जिल्हा कारागृहात स्थानबध्द केले. ही कारवाई पोलिस अधीक्षक, जी. श्रीधर यांचे मार्गदर्शनाखाली अप्पर पोलिस अधीक्षक मोनिका राऊत, तसेच उपविभागीय पोलिस अधिकारी, शहर विभाग, अकोला, स्थानिक गुन्हे शाखा येथील पोलिस निरीक्षक संतोष महल्ले, पोहेकॉ मंगेश महल्ले यांनी तसेच डाबकी रोड पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक शिरीष खंडारे, पो.स्टे.मधिल कर्मचारी यांनी केली.

आतापर्यंतच्या सर्वाधिक कारवाया

अकोला जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहुन शांतता रहावी याकरिता गुन्हे करणारे व कारवाईस न जुमानणाऱ्या सराईत गुन्हेगारांची माहिती संकलीत करण्यात आली आहे. त्यांचे विरूध्द एमपीडीए ॲक्ट खाली कारवाई प्रस्तावित आहे. माहे जुलै २०२० ते जुलै २०२२ या कालावधीमध्ये एमपीडीए कायद्यान्वये एकूण ७५ गुन्हेगारांनावर स्थानबध्दतेची कारवाई करण्यात आलेली आहे. ही कारवाई अकोला जिल्ह्यातील आजपर्यंतची सर्वात मोठी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis: ''मी शंभर रुपये द्यायला तयार आहे, पण...'' उद्धव ठाकरेंच्या भाषणावरुन फडणवीसांचं आवाहन

Beed Railway: बीडकरांची ४० वर्षांची स्वप्नपूर्ती! उद्यापासून अहिल्यानगर ते बीड 'रेल्वे'सेवेला सुरुवात; काय आहेत वैशिष्ट्ये?

Yermala News : धाराशिव जिल्ह्यातील कला केंद्रांच्या गैरप्रकारांवर कारवाईसह परवाने रद्द करण्याचे पालकमंत्र्यांचे आदेश

‘एसटी’ आरक्षणासाठी बंजारा समाजाचा सोलापुरात मोर्चा! पारंपरिक वेशभूषेत तरुणांसह महिलांची मोठी गर्दी; आरक्षण मिळेपर्यंत न थांबण्याचा बंजारा समाजाचा निर्णय

Latest Marathi News Updates: गेवराईच्या पूरग्रस्त भागाची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली पाहणी

SCROLL FOR NEXT