Akola Education Marathi News Corona Coaching Classes Student Teacher Tuition started 
अकोला

कोचिंग क्लासेस होणार सुरू, एका क्लासमध्ये किती असणार विद्यार्थी?

सकाळ वृत्तसेवा

अकोला :  कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाययोजने अंतर्गत जिल्ह्यात ३१ जानेवारीपर्यंत आदेश लागू करण्यात आले होते. महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार हे आदेश कायम ठेवण्यात आले असून त्याची मुदत २८ फेब्रुवारीपर्यंत वाढविण्यात आली.

त्याअंतर्गत सर्व प्रकारची खाजगी शैक्षणिक प्रशिक्षण केन्‍द्रे, खाजगी शिकवणी वर्ग, कोचिंग क्‍लासेस यांना त्‍यांचे वर्ग १ फेब्रुवारी २०२१ पासून सुरू करण्‍याकरिता परवानगी देण्‍यात येत आहे.

खाजगी शैक्षणिक प्रशिक्षण केन्‍द्रे, खाजगी शिकवणी वर्ग, कोचिंग क्‍लासेस यांनी त्‍यांचे वर्ग सुरू करताना प्रत्‍येक बॅचमध्‍ये नियमीत आसन क्षमतेच्‍या २५ टक्के किंवा जास्‍तीत जास्‍त २० विद्यार्थी राहतील.

तसेच दोन बॅचच्‍या मध्‍ये अर्धा तासाचा अवकाश ठेवून प्रत्‍येक वेळी हॉल व रुमचे तसेच संगणक साहित्‍याचे निर्जंतुकीकरण करणे बंधनकारक राहिल. कोविड-१९ चे अनुषंगाने केन्‍द्र शासन व राज्‍य शासन यांनी वेळोवेळी दिलेल्‍या निर्देशांचे तंतोतंत पालन करणे बंधनकारक राहिल.

या कार्यालयाने वेळोवेळी निर्गमित करण्‍यात आलेल्‍या विविध आदेशांचे उल्‍लंघन होणार नाही याची संबंधित संचालकांनी व संस्थेने दक्षता घेण्‍यात यावी, असे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आदेशाव्दारे कळविले आहे.

(संपादन - विवेक मेतकर)

अकोला जिल्ह्यातील ताज्या बातम्या - क्लिक करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Board Exam Paper : दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना दिलासा ! प्रश्नपत्रिका आता फक्त ३-४ पानांचीच, मंडळाची १८ कोटींची बचतही होणार

ग्रामीण मनोरंजनासाठी नवे दालन! ‘किस्सा शुरू टॉकीज’मुळे आता गावागावांत घरबसल्या पाहाता येणार नवीन चित्रपट

IPL 2026 फायनलनंतर मोठी घटना! गुजरात टायटन्सच्या बसला आग, वाचा नेमकं काय घडलं?

Shirdi: एसटी-कारच्या अपघातात दोघांचा मृत्यू, ११ जखमी; लेकीच्या वाढदिवसाला निघालेल्या वडिलांसह काकावर काळाचा घाला

Latest Marathi News Update : विषारी दारु प्रकरणात १५ मृत्यू, सीआयडीची माहिती

SCROLL FOR NEXT