election
election sakal
अकोला

अकोला : सहा उपसभापतींची निवड उद्या; तर दोन सभापतींची २२ रोजी

सकाळ वृत्तसेवा

अकोला ः जिल्हा परिषदेतील दोन सभापती पदांच्या निवडणुकीनंतर अकोला व तेल्हारा पंचायत समितीच्या सभापतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. या दोन सभापती पदांसाठी २२ नोव्हेंबर रोजी निवडणुकीची प्रक्रिया पार पडेल. त्यासोबतच सहा पंचायत समितीच्या उपसभापती पदाच्या निवडणुकीची प्रक्रिया १८ नोव्हेंबर रोजी पार पडेल. त्यामुळे आता पुन्हा एकदा राजकीय घडामोळींना वेग आल्याचे दिसून येत आहे.

ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन तेल्हारा व अकोला पंचायत समितीच्या सभापतींच्या पदांसह इतर पद रिक्त झाले होते. त्यामुळे पोटनिवडणूक घेवून नामाप्र अर्थात ओबीसीच्या प्रवर्गासाठी राखीव जागा खुल्या प्रवर्गातून भरण्यात आल्या. दरम्यान सर्व सदस्यांची निवडणूक झाल्यामुळे रिक्त झालेल्या तेल्हारा व अकोला पंचायत समितीच्या सभापतींची निवड कोणत्या प्रवर्गातून करण्यात यावी यासाठी जिल्हा प्रशासनाने शासनाकडे मार्गदर्शन मागितले होते.

सदर पदी नामाप्र उमेदवारांची निवड करण्यात यावी यासंबंधीचे आदेश शासनाने जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. त्यामुळे आता तेल्हारा व अकोला पंचायत समितीच्या सभापतींचे पद नामाप्र प्रवर्गातून भरण्यात येतील. तेल्हारामधील सभापतीचे पद नामाप्र स्त्री तर अकोला येथील सभापतीचे पद नामाप्र मधून भरण्यात येईल. यासंबंधीची प्रक्रिया पार पाडण्यासाठी २२ नोव्हेंबर रोजी संंबंधित पंचायत समितीमध्ये सभेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानुसार सभापती पदासाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सकाळी ११ ते दुपारी १ वाजेपर्यंत पार पडेल. त्यानंतर दुपारी ३ वाजता सभापती पदासाठी निवडणुकीची प्रक्रिया पार पडेल.

उपसभापतींची उद्या

तेल्हारा, अकोट, मूर्तिजापूर, अकोला, बार्शीटाकळी व पातूर पंचायत समितीच्या उपसभापतींचे पद रिक्त आहेत. त्यामुळे सदर पदांसाठी १८ नोव्हेंबर रोजी निवडणुकीप्रक्रिया पार पडेल. त्यासाठी संबंधित तालुक्यातील तहसीलदार यांची अध्यासी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. १८ नोव्हेंबर रोजी संबंधित पंचायत समितीच्या सभागृहात अध्यासी अधिकारी निवडणुकीची प्रक्रिया पार पाडतील. त्यानुसार सकाळी ११ ते दुपारी १ वाजेपर्यंत नामनिर्देशन पत्रांचे वाटप व ते स्वीकारण्यात येतील. त्यानंतर दुपारी ३ वाजता आवश्यकता पडल्यास प्रत्यक्ष निवडणुकीची प्रक्रिया पार पडेल.

असे आहे पंचायत समितीचे बलाबल

अकोला :- पंचायत समिती निवडून पोटनिवडणुकीत वंचितांचे एकूण तीन सदस्य आले. एकूण २० सदस्यांपैकी पैकी ११ वंचितचे सदस्य आहेत. त्यामुळे सभापती पुन्हा वंचितचाच हाेणार आहे.

तेल्हारा :- पंचायत समितीमध्ये पोटनिवडणुकीत वंचितचे सदस्य ३ सदस्य विजयी झाले आहेत. १६ पैकी ९ सदस्य वंचितचे झाले आहेत. त्यामुळे पक्षाचा सभापती होणार आहे.

अकोट :- पंचायत समितीमधून पोटनिवडणुकीत वंचितच्या एक सदस्या विजयी झाल्या. एकूण संख्या ७ झाली आहे. एका जागेवर दाेन उमेदवारांना समान मतं मिळाली. त्यात ईशवरचिठ्ठीतून शिवसेनेचा विजय झाला. एका जागेवर प्रहारचा विजय झाला. एकूण सदस्य संख्या १६ आहे.

पातूर :- पंचायत समिती मधून पोटनिवडणुकीत वंचितचे २ सदस्य निवडून आले आहेत. त्यांची संख्या ६ झाली आहे. एकूण १२ जागा आहेत. शिवसेनेचे ५ व एक कॉंग्रेसला आहे. सध्या सत्ता शिवसेेनेची आहे.

बाळापूर :- पंचायत समिती पोटनिवडणुकीत वंचितचे तीन सदस्य विजयी झाले असून, एकूण १४ पैकी ९ सदस्य वंचितच आहेत. सत्ता कायम राहणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Loksabha election : ...म्हणून ओमराजे निंबाळकर शिंदेंसोबत गेले नाहीत; 'सकाळ'च्या खास मुलाखतीत केला खुलासा

T20 World Cup 2024: BCCI निवड समितीची जय शाह यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बैठक! टीम इंडियाची घोषणा कधी? अपडेट्स आल्या समोर

Patanjali Products Ban: पतंजलीच्या 14 औषधांवर उत्तराखंडमध्ये बंदी! सुप्रीम कोर्टानं फटकारल्याचा परिणाम

Loksabha election 2024 : बेटों के सम्मान में, 'मर्द' उतरे मैदान मे! ना विजयाची चिंता ना प्रचाराची फिकीर; पुरुषांच्या हक्कासाठी निवडणुकीच्या मैदानात

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT