मुलींचा जन्म sakal
अकोला

अकोला : जिल्ह्यात ऑगस्टअखेर हजार मुलांमागे ९७२ मुलींचा जन्म

पीसीपीएनडीटीची जिल्हास्तरीय दक्षता समिती बैठक

सकाळ वृत्तसेवा

अकोला : जिल्ह्यात मुलींच्या जन्मदरात वाढ झाली आहे. जिल्ह्यात ऑगस्ट २०२१ अखेर एक हजार मुलांमागे ९७२ मुली असे हे प्रमाण आहे. सन २०१६-१७ मध्ये हे प्रमाण एक हजार मुलांमागे ९०५ मुली इतके होते. गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व निदान तंत्रे (लिंग निवडीस प्रतिबंध) कायदा अर्थात पीसीपीएनडीटी कायद्याच्या अंमलबजावणी संदर्भात जिल्हास्तरीय दक्षता समितीच्या बैठकीत माहिती देण्यात आली.

समितीच्या जिल्हास्तरीय दक्षता समितीची बैठक मंगळवारी (ता. २१) लोकशाही सभागृहात पार पडली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे हे अध्यक्षस्थानी होते. बैठकीस जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वंदना पटोकार वसो, जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. आरती कुलवाल, सहाय्यक आयुक्त अन्न व औषध प्रशासन वि.द. सुलोचने, डॉ. सुनिल मानकर, डॉ. स्वप्निल माहोरे, डॉ. मीनल पवार, डॉ. अस्मिता पाठक, डॉ. मीना शिवाल, डॉ. व्ही.टी. सोनोने, डॉ. श्वेता वानखडे, डॉ. सैय्यद इशरत तसेच अन्य सदस्य उपस्थित होते. मुलींच्या जन्माचे स्वागत करतांनाच समाजात होत असलेले गर्भावस्थेतील गर्भस्थ बालकाच्या लिंग निदानाचे प्रकार निंदनीय आहेत. हे प्रकार थांबविण्यासाठी समाजात जनजागृतीसाठी प्रयत्न करावे. खबरी योजनेचा अधिकाधिक प्रसार करुन असे गैरप्रकार थांबविण्यासाठी नागरिकांचाही सहभाग घ्यावा. तसेच मिळालेल्या खबरींच्या आधारे समिती मार्फत सोनोग्राफी सेंटर्सची अचानक तपासणीही करावी, असे निर्देश निवासी उपजिल्हाधिकारी खडसे यांनी दिले.

कायद्याच्या कडक अंमलबजावणीमुळे वाढ

जिल्ह्यात ग्रामीण भागात शासकीय पाच, तर खासगी २२ असे २७ सोनोग्राफी चाचणी केंद्र आहेत. महापालिका हद्दीत चार शासकीय व १०६ खासगी असे एकूण ११० सोनोग्राफी चाचणी केंद्र आहेत. जिल्ह्यात कायद्याची अंमलबजावणी करण्यात येत असल्यामुळे दर एक हजार मुलांमागे मुलींच्या जन्मदरात वाढ झाली आहे.

गर्भलिंग निदानाची माहिती दिल्यास बक्षीस

पीसीपीएनडीची कायद्यासंदर्भात जिल्ह्यात नियमित जनजागृती करण्यात येते. या समितीमार्फत जिल्ह्यात सन् २०१७ पासून दहा स्टिंग ऑपरेशन करण्यात आले. गर्भलिंग निदानाचे प्रकार उघडकीस आणण्यासाठी शासनाने खबरी बक्षीस योजना राबवलेली आहे. अशा प्रकारांबाबत माहिती दिल्यास एक लाख रुपयांपर्यंतचे बक्षीस खबर देणाऱ्यास दिले जाते.

असे वाढले मुलींचे प्रमाण

सन २०१६-१७ मध्ये ९०५, २०१७-१८ मध्ये ९११, २०१८-१९ मध्ये ९२४, २०१९-२० मध्ये ९५६, २०२०-२१ मध्ये ९४९ तर सन् २०२१-२२ मध्ये (ऑगस्ट २१ अखेर) ९७२ इतके मुलींचे प्रमाण झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्रात आहे काय? तुम्ही आमच्या पैशावर जगताय; भाजप खासदाराचं वादग्रस्त विधान

Bus Accident : समोरून आलेल्या कारला वाचवताना बसचा भीषण अपघात; 8 जण जागीच ठार, 32 हून अधिक प्रवासी गंभीर जखमी

Latest Maharashtra News Updates : उद्यापासून अंशतः विनाअनुदानित शिक्षक संघटनांचं 'शाळा बंद' आंदोलन

मोबाईल हॅक झाल्याची भीती, फार्मसीच्या २० वर्षीय तरुणानं जीवन संपवलं; एकुलत्या एक लेकाच्या मृत्यूनं आई-वडिलांचा आक्रोश मन हेलावणारा

Mahadev Munde Case: परळी येथील महादेव मुंडे खूनप्रकरणी विजयसिंह बांगरचा जबाब नोंदविला

SCROLL FOR NEXT