Akola Gram Panchayat by election 23 candidates filed applications sakal
अकोला

अकोला : ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी २३ उमेदवारांचे अर्ज दाखल

छाननी : वैध-अवैधतेवर शिक्कमोर्तब आज

सकाळ वृत्तसेवा

अकोला : राज्य निवडणूक आयोगाने जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या रिक्त झालेल्या पदांच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला असून जिल्ह्यातील १२५ ग्रामपंचायतींमध्ये २०७ रिक्त पदे आहेत. या रिक्त जागांसाठी उमेदवारी दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत २३ जणांचे उमेदवारी अर्ज दाखल झाले असून बहुतांश जागा या अविरोध होणार आहेत.

जिल्ह्यातील सात तालुक्यांतील १२५ ग्रामपंचायतींच्या २०७ रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. संबंधित ग्रामपंचायतींसाठी नामनिर्देशन पत्र भरण्याची प्रक्रिया १३ मे पासून सुरू झाली असून २० मे अखेरच्या दिवसापर्यंत २३ उमेदवारांनी अर्ज दाखल केले.

संबंधित नामनिर्देशनपत्रांची छाननी सोमवारी करण्यात येईल, तर २५ मे रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत नामनिर्देशनपत्रे मागे घेता येतील. तसेच निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा तसेच अंतिमरित्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्धी करण्याची तारीख २५ मे दुपारी ३ वाजतानंतर असून आवश्यकता असल्यास ५ जून रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत मतदान घेण्यात येईल. तर ६ जून रोजी मतमोजणी करण्यात येईल. ९ जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत निवडणूक निकालाची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Mayor Election Postponed : पुणे महापौर व उपमहापौर पदाची निवडणूक लांबणीवर, महापालिकेचे आयुक्तांना पत्र

U19 World Cup: पाकिस्तानच्या युवा टीमवर फिक्सिंगचा भारतीय क्रिकेटरडून आधी आरोप अन् मग अचानक माघार, नेमकं काय घडलं?

Fire Breaks Out at Mahape MIDC : नवी मुंबईतील महापे MIDC मध्ये अग्नितांडव, केमिकल कंपनीला भीषण आग; अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल

Bigg Boss Marathi 6 : "भाऊच्या धक्क्यावर तुला जागा नाही" भडकलेल्या रितेशने रुचिताची खरडपट्टी काढली

अमेरिकेत भारतीयानं पत्नीसह ३ नातेवाईकांची केली हत्या; घरात सापडले ४ मृतदेह

SCROLL FOR NEXT