Akola Forest Department  Sakal
अकोला

Akola Forest Department : वनमजुरांना दहा लाखांचे विमा कवच; अपघात, सर्पदंश, वीजपडून मृत्यू झाल्यास...

आरएफओ शिरसाट यांच्या पुढाकारातून सामाजिक वनिकरणचा स्तूत्य उपक्रम

सकाळ वृत्तसेवा

Akola Forest Department - सामाजिक वनीकरण विभाग अकोलाचे वनपरिक्षेत्र अधिकारी संदीप शिरसाट यांच्या पुढाकारातून, सामाजिक वनीकरण विभाग अकोला, उत्थान फाउंडेशन व जिल्हा विधी प्राधिकरण अकोला यांच्या संयुक्तपणे मनरेगा अंतर्गत वनमजुरांची विमा शिबिराचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते.

या विम्याच्या माध्यमातून संबंधित मजुरांना दहा लाख रुपयांचे विमा कवच मिळणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

सामाजिक वनीकरण विभागाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती रोपवाटीका लोणी येथे या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सामाजिक वनीकरण विभागात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांनी या शिबिराचा लाभ घेतला.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा न्यायालयाचे विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव योगेश पैठणकर, रोजगार हमी योजनाचे उपजिल्हाधिकारी अनिल पाटील, सामाजिक वनीकरण विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी संदीप शिरसाट,

पोस्ट कार्यालयाचे क्षेत्रिय प्रबंधक प्रसन्नकुमार भल्लं, राज्य अनकक्षक मनरेगा तसेच उत्थान फाउंडेशनचे अध्यक्ष प्रवीण इंगळे यांची प्रमुख उपस्थिती होती. हा विमा काढण्यासाठी वार्षिक ४०० रुपये शुल्क पोस्ट ऑफिसमध्ये भरावे लागणार आहे.

हा विमा काढल्यास यामध्ये समाविष्ठ मजुरांना भविष्यात रस्ता अपघात, सर्पदंश, वीजपडून मृत्यू झाल्यास त्यांच्या परिवारास किंवा कायम अपंगत्व आल्यास त्यांना दहा लाख रुपयांच्या विम्याची राशी मिळेल.

रुग्णालयात उपचार सुरू असल्यास त्याकरिता ६० हजार रुपयांची मदत मिळेल व मृत्यू झालेल्या व्यक्तिच्या पाल्याला मोफत शिक्षण देण्यात येईल, अशी माहिती आरएफओ संदीप शिरसाट तसेच प्रमुख उपस्थितांनी दिली.

या विम्याचा लाभ जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी घ्यावा असे आवाहन जिल्हा न्यायालयाचे विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव योगेश पैठणकर व सामाजिक वनीकरण विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी संदीप शिरसाट यांनी केले.

रोजगार हमी योजनेंतर्गत कार्यरत वनमजुरांना विम्याचे सुरक्षा कवच मिळावे, याकरिता आम्ही पोस्ट कार्यालयाशी संपर्क साधून सर्व वनमजुरांचा दहा लाख रुपयांचा विमा आयोजित शिबिरांतर्गत काढला आहे. त्याकरिता केवळ ४०० रुपये संबंधित मजुरांकडून पोस्टात जमा करण्यात आलेत.

या विमा योजनेनुसार समाविष्ठ मजुरांना भविष्यात रस्ता अपघात, सर्पदंश, वीजपडून मृत्यू झाल्यास त्यांच्या परिवारास किंवा कायम अपंगत्व आल्यास त्यांना दहा लाख रुपयांच्या विम्याची राशी मिळेल.

रुग्णालयात उपचार सुरू असल्यास त्याकरिता ६० हजार रुपयांची मदत मिळेल व मृत्यू झालेल्या व्यक्तिच्या पाल्याला मोफत शिक्षण देण्यात येईल.

- संदीप शिरसाट, वनपरिक्षेत्र अधिकारी, सामाजीक वनीकरण, अकोला

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

HBA Scheme: तुम्ही होम लोनचा हप्ता भरू शकत नाहीत? सरकारकडून मिळतेय 25 लाख रुपयांची मदत

Disqualification Bill: पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांना 30 दिवस तुरुंगवास झाल्यास पदमुक्त होणार! संसदेत मांडलं जाणार ऐतिहासिक विधेयक

Mobile Protection Tips: पावसाळ्यात मोबाईल भिजतोय? काळजी करू नका, हे उपाय करा!

Prithvi Shaw : मला कुणाची सहानुभूति नकोय... महाराष्ट्र संघाकडून शतक झळकावताच पृथ्वी शॉचा आजी-माजी खेळाडूंना टोमणा

Chiploon Karad Accident : चिपळूण-कऱ्हाड राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात पुण्याचे ५ जण ठार, रिक्षाचा चक्काचूर

SCROLL FOR NEXT