Akola Lok Sabha Election Esakal
अकोला

Akola Lok Sabha Election: ‘मविआ’च्या निर्णयाकडे लक्ष; मविआ आणि वंचित एकत्र आले नाही तर तिंरगी लढत होण्याची शक्यता

Akola Lok Sabha Election: अकोला लोकसभा क्षेत्रात अकोला पूर्व, पश्चिम, अकोट, मूर्तिजापूर, बाळापूर व रिसोड मतदारसंघ येतात. पैकी रिसोडमध्ये काँग्रेस, तर बाळापूर विधानसभेत ठाकरे गटाचे आमदार आहेत.

सकाळ वृत्तसेवा

Akola Lok Sabha Election: भाजप व वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार निश्चित झाला आहे. ‘मविआ’चा अद्याप वंचित बहुजन आघाडीसोबत जाण्याचा निर्णय झाला नाही. त्यामुळे ‘मविआ’कडून कोणता पक्ष लढेल याबाबत साशंकता आहे. अकोला लोकसभा क्षेत्रात अकोला पूर्व, पश्चिम, अकोट, मूर्तिजापूर, बाळापूर व रिसोड मतदारसंघ येतात. पैकी रिसोडमध्ये काँग्रेस, तर बाळापूर विधानसभेत ठाकरे गटाचे आमदार आहेत. अन्य चार ठिकाणी भाजप आहे. अकोल्यात ‘वंचित’ला ‘मविआ’ची साथ न मिळाल्यास डॉ. आंबेडकरांसमोर भाजपचे अनुप धोत्रे यांचे आव्हान असेल. तर मविआ आणि वंचित एकत्र आले नाही तर तिंरगी लढत होण्याची शक्यता आहे,

२०१९चे चित्र

संजय धोत्रे (भाजप) विजयी मते : ५,५४,४४४

ॲड. प्रकाश आंबेडकर (वंचित बहुजन आघाडी) मते : २,७८,८४८

हिदायत पटेल (काँग्रेस) मते : २,५४,३७०

भाई बी. सी. कांबळे (बसप) मते : ७,७८०

विजयी उमेदवारांचे मताधिक्य : २,७५,५९६

वर्चस्व

२००४ : भाजप

२००९ : भाजप

२०१४ : भाजप

२०१९ : भाजप

सद्य:स्थिती

काँग्रेसकडून डॉ. अभय पाटील व ठाकरे गटाकडून गजानन दाळू गुरुजी लढवू शकतात.

भाजपने खासदार पुत्र अनुप धोत्रे यांच्या माध्यमातून रणशिंग फुंकले आहे.

अकोला लोकसभा मतदारसंघात १९८४ पासून झालेल्या लोकसभा निवडणुकीत ॲड. आंबेडकर हे रिंगणात उतरले होते.

मराठा पाटील, कुणबी व मुस्लिम समाजाची मते निर्णायक ठरणार आहेत.

हे प्रभावी मुद्दे

एमआयडीसी व ग्रामीण भागातील विकासकामांचा प्रश्‍न

अकोट-अकोला या रखडलेल्या रस्त्यांसह अपुऱ्या सिंचनाच्या सुविधा या मुद्द्याचा निवडणुकीवर प्रभाव शक्य

अकोला येथील महानगरपालिका हद्दवाढीमधील विकास

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI: विराट कोहली अन् शुभमन गिल यांच्यात 'कड्याकाचं' भांडण? स्टार फलंदाज कर्णधाराला बोट दाखवत बडबडला Video Viral

मुंबईत विसर्जन मिरवणुकीत भरधाव कार घुसली, गणपतीच्या ट्रॉलीला धडक देत 4 जणांना उडवलं; घटनास्थळाचा VIDEO

सौंदर्य अन् बुद्धिमत्तेचा संगम! वयाच्या २३व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC क्रॅक करून बनली IFS अधिकारी, कोण आहे तमाली साहा?

Asian Games 2026 : अडखळला, पडला... पण जिद्दीने शर्यत पूर्ण करून भारताचा ४४ वर्षांचा दुष्काळ संपवला! कोण आहे सावन बरवाल?

Satara DJ Dolby Action : पोलिसांची कारवाई चुकीचीच! साताऱ्यात डीजे जप्त झाल्यानंतर उदयनराजेंनी थेट घेतली डॉल्बी चालकांची बाजू; पालकमंत्री देसाईंची भूमिका काय?

SCROLL FOR NEXT