Akola Marathi News Corona 57 new positive, 15 discharged 
अकोला

कोरोनाचे ५७ नवे पॉझिटिव्ह, १५ जणांना डिस्चार्ज

सकाळ वृत्तसेेवा

अकोला :  कोरोना संसर्ग तपासणीचे मंगळवारी (ता. ५) एक हजार ४ अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी ९४७ अहवाल निगेटिव्ह तर ५७ अहवाल पॉझिटिव्ह आले. याव्यतिरीक्त १५ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे आता जिल्ह्यात ५०७ रुग्णांवर उपचार सुरा आहेत.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण ७२ हजार २४६ जणांचे अहवाल आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे ७० हजार ५७९ फेरतपासणीचे २९२ तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे १ हजार ३७७ नमुने होते. त्यापैकी ७२ हजार १७५ अहवाल प्राप्त झाले आहेत.

हेही वाचा - अर्थसंकल्पाची तरतुद 165 कोटींची, खर्च फक्त 15 कोटी 60 लाखांचा

एकूण निगेटिव्ह अहवालांची संख्या ६३ हजार ५७८ तर पॉझिटिव्ह अहवाल १० हजार ६८७ आहेत. याव्यतिरीक्त मंगळवारी (ता. ५) दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून तीन जणांना, ओझोन हॉस्पिटल येथून एक, हॉटेल स्कायलार्क येथून चार, हॉटेल रेजेन्सी येथून एक, तर बिहाडे हॉस्पीटल येथून दोन, तसेच होम आयसोलेशन येथून चार, अशा एकूण १५ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

या भागात आढळले नवे रुग्ण
कोरोनाचे मंगळवारी दिवसभरात ५७ अहवाल पॉझिटिव्ह आले. सकाळी २७ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात आठ महिला व १९ पुरुषांचा समावेश आहे. त्यातील डाबकी रोड येथील चार, जठारपेठ, कौलखेड व गोरक्षण रोड येथील प्रत्येकी दोन, तर उर्वरित शास्त्री नगर, श्रीराम चौक, जूने शहर, न्यु खेतान नगर, सावकार नगर, रजपूतपुरा, खडकी, राधे नगर, अकोट, बाळापूर नाका, मूर्तिजापूर, गीता नगर, खडकी, राम नगर, छोटी उमरी, रणपिसे नगर व सिव्हील लाईन येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवाशी आहे. सायंकाळी ३० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात नऊ महिला व २१ पुरुषांचा समावेश आहे. त्यातील तेल्हारा येथील चार, अकोट येथील तीन, गौरक्षण रोड येथील दोन, तर उर्वरित नकाशी ता. बाळापूर, बाळापूर नाका, वाडेगाव, पिंपरी जैनपूर ता. अकोट, शिव वडनेर ता. तेल्हारा, दहीगाव ता. तेल्हारा, हिवरखेड ता. तेल्हारा, श्रीनाथ मनब्दा ता. तेल्हारा, अडसुळ ता. तेल्हारा, दुर्गा चौक, चौरे प्लॉट, कौलखेड, कॉग्रेस नगर, बलवंत नगर, जवाहर नगर, वर्धमान नगर, नालंदा नगर, अडसना, हिंगणा रोड, भांडपुरा चौक व सोमथाना येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवाशी आहेत.

हेही वाचा - अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

कोरोनाची सद्यस्थिती
- एकूण पॉझिटिव्ह - १०६८७
- मृत- ३२३
- डिस्चार्ज ९८५७
- ॲक्टिव्ह रुग्ण - ५०७

(संपादन - विवेक मेतकर)

 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Air Pollution : दिल्लीतील वायू प्रदूषण कोरोनापेक्षाही घातक, 'या' लोकांना ताबडतोब शहर सोडण्याचा सल्ला

राहुरी तालुक्यातील धक्कादायक घटना! 'जमिनीच्या आमिषाने महिलेवर अत्याचार';खोटे मृत्युपत्र तयार करुन जमीन बळकावली..

Latest Marathi News Live Update : ..अखेर प्रशासनाला आली जाग; कारखानदार-संघटनांची आज महत्त्वाची बैठक

Daily horoscope: आजचे राशिभविष्य-३ नाेव्हेंबर २०२५

महिला वर्ल्ड कपच्या ५२ वर्षांच्या इतिहासात कुणाला जमलं नव्हतं, दीप्तीने केला विश्वविक्रम

SCROLL FOR NEXT