Akola Marathi News Donkey agitation will be held on the flyover from January 26 at Murtijapur 
अकोला

'शहाण्यांनो, चालण्याकरिता रस्ता द्या ! २६ जानेवारीपासून उड्डाणपुलावर होणार गाढवाचे आंदोलन

सकाळ वृत्तसेेवा

मूर्तिजापूर (जि.अकोला)  : 'शहाण्यांनो चालण्याकरिता रस्ता द्या !' अशी आरोळी ठोकत गाढवाचे धरणे आंदोलन २६ जानेवारीपासून येथील हिरपूर रस्त्यावरील उड्डाणपुलावर सुरू होणार आहे.

राष्ट्रशक्ति हमचालीस संघटनेने या आंदोलनाचा इशारा राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना येथील उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत एका निवेदनाद्वारे दिला आहे. अमरावती आणि आकोला जिल्ह्यांना जोडणाऱ्या आसरा रस्त्याची अक्षरशः चाळणी झाली आहे.

त्यामुळे हाडांचे व मणक्याचे आजार, अपघात, मृत्यूमुळे जनता त्रस्त आहे. या रस्त्याच्या दुरूस्तीची मागणी अनेक वर्षांपासून सुरू आहे. लोकप्रतिनिधी उदासीन आहेत. त्यांनी या रस्त्याची अंदाजपत्रकीय तरतूद करवून घेतली नसल्याचे मोठे शल्य आहे. दयनीय अवस्थेतील या रस्त्याऐवजी ग्रामस्थ नाइलाजास्तव लांब अंतराच्या व जोखीमीच्या पर्यायी रस्त्याचा अवलंब करीत आहेत. 

लोकप्रतिनिधींप्रती प्रचंड रोष निर्माण झालेल्या ग्रामस्थांची सहनशिलता संपली आहे. मानवी प्रयत्न थकले आहेत. त्यामुळे आमच्या आंदोलनातून प्रतिकात्मक गाढव 'शहाण्यांनो, चालण्याकरिता रस्ता द्या ! ', असे आवाहन करणार असल्याचे या आंदोलनासंदर्भात हम चालीस संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बबनराव डाबेराव यांनी सांगितले.

बबनराव डाबेराव यांच्यासह तालुकाध्यक्ष रोहीत सोळंके, सचिव किशोर सोनोने, विजय राऊत, मोहंमद शहाबुद्दीन, आकबर ठेकेदार व आन्य या धरणे आंदोलनात सहभागी होतील. निवेदनाच्या प्रति केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे, जिल्ह्याचे पालकमंत्री, बाळापूर, दर्यापूर व येथील आमदार तसेच ठाणेदारांना पाठविण्यात आल्या आहेत.  

(संपादन - विवेक मेतकर)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Exam : राज्यसेवा मुख्य परीक्षा अखेर पुढे ढकलली; स्थापत्य अभियांत्रिकी, गट-ब मुख्य परीक्षेलाही स्थगिती

Karad News : कऱ्हाड तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा; पृथ्वीराज चव्हाण यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी

Karad News : पुणे-बंगळुरू महामार्गावरून कऱ्हाड शहरात येण्यासाठी नवीन ४० फुटी मार्ग

Vani News : सप्तशृंगी-वणी गड घाट रस्ता तीन दिवस रस्ता कामासाठी बंद...

वयाच्या ५२ व्या वर्षीही थलपती विजय इतके फिट कसे? इडली अन् अंड्यांपासून मटण बिर्याणीपर्यंत; पाहा त्यांचा डाएट प्लॅन!

SCROLL FOR NEXT