Akola Marathi News Fear of bird flu; Dead crows found at CEOs residence
Akola Marathi News Fear of bird flu; Dead crows found at CEOs residence 
अकोला

बर्ड फ्लूची धास्ती; सीईओंच्या निवासस्थानी आढळले मृत कावळे

सकाळ वृत्तसेेवा

अकोला :  जिल्ह्यात काही दिवसांपासून कावळे, चिमण्या, पोपट व इतर पक्षी मृतावस्थेत आढळत आहेत. त्यामुळे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी जिल्ह्यात दोन ठिकाणी अलर्ट जारी केला आहे.

मूर्तिजापूर तालुक्यातील हातगाव येथील राम हिंगणकर यांच्या घरापासून १० किलोमीटर त्रिज्येतील क्षेत्र सतर्क क्षेत्र (अलर्ट) म्हणून घोषित करण्यात आले आहे.

राम हिंगणकर यांच्या घरी दोन चिमण्या मृत अवस्थेत आढळल्या होत्या. त्यासोबतच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) सौरभ कटियार यांच्या शासकीय निवासस्थानाजवळ सुद्धा सोमवारी (ता. १८) दोन कावळे मृतावस्थेत आढळले होते.

त्यामुळे त्यांच्या निवासस्थानापासून १० किलोमीटर त्रिज्येतील क्षेत्र सतर्क क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. सदर दोन्ही प्रकरणी मृत पक्षांचे नमूने वैद्यकीय प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.

सध्या जिल्ह्यात बर्ड फ्लूचा शिरकाव झाला नसला तरी पशु-पक्षी पालकांनी योग्य उपाययोजना करत सावध राहण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

(संपादन - विवेक मेतकर)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR : दिल्लीचा राजस्थानला दणका, घरच्या मैदानात मिळवला दणदणीत विजय; संजू सॅमसनचे अर्धशतक व्यर्थ

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT