Akola Marathi News Government milch cattle distribution scheme; Meeting of Social Welfare Committee. 
अकोला

अर्ज आले दहा हजार, निवडले फक्त 95 लाभार्थी

सकाळ वृत्तसेवा

अकोला :  जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण समितीच्या सभेत शुक्रवारी (ता. २९) दुधाळ जनावरे पुरविणे योजनेच्या लाभार्थी यादीला मंजुरी देण्यात आली. जिल्ह्यातील ९५ लाभार्थ्यांना या याेजनेचा लाभ मिळणार आहे. याेजनेसाठी जिल्ह्यातून १० हजार ३३३ अर्ज प्राप्त झाले हाेते. एक लाख २० हजार रुपये आणि विम्या असा लाभ देण्यात येणार आहे.

जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागामार्फत गत आर्थिक वर्षात २०१९-२० मध्ये तर दुधपूर्णा याेजना राबविण्यात आली. त्यानंतर सन २०२०-२१ या आर्थिक वर्षात दुधाळ जनावरे वाटप ही याेजना राबविण्याची तयार करण्यात आली. ही याेजना १०० टक्के अनुदान तत्वावर राबविण्यात येत आहे. दरम्यान शुक्रवारी (ता. २९) जिल्हा परिषद समाज कल्याण समितीच्या सभेत योजनेच्या लाभार्थी निवडीला मंजुरी देण्यात आली.

सभेला सभापती आकाश सिरसाट, शिवसेनेचे जि.प.सदस्य डाॅ. प्रशांत अढाऊ, सदस्य गजानन डाफे, आम्रपाली खंडारे, नीता गवई, कोमल पेटे, सुमन गावंडे, माया नाईक, दीपमाला दमदर, वंदना झळके, संदीप सरदार, बार्शीटाकळी पंचायत समिती सभापती प्रकाश वाहुरवाघ आणि सचिव म्हणून खाराेडे उपस्थित होते.

हेही वाचा - ऐऽऽ शंकरपाळ्या! 'एका चापटीत खाली पाडीन, दुसरी लागू बी देणार नाई', दोघांच्या भांडणाचा व्हिडीओ सुसाट....

विमा कवचही मिळणार
दुधाळ जनावरे वाटप याेजनेसाठी १ काेटी २० लाखाची तरतूद करण्यात आली. म्हैसवर्गीय दाेन दुधाळ जनावरे वाटप करण्यात येणार आहेत. यापूर्वी प्रती जनावर ४० हजार रुपये अनुदान देण्याची तरतूद हाेती. मात्र आता हे अनुदान ६० हजार रुपये करण्यात आले आहे. तसेच विम्याचेही कवच मिळणार आहे. त्यानुसार आता या याेजनेअंतर्गत प्रत्येक लाभार्थ्याला जवळपास १ लाख २५ हजार रुपयांपर्यंत (प्रती लाभार्थी) लाभ मिळणार आहे.

हेही वाचा - Union Budget 2021: अर्थसंकल्पात सरकारला करावी लागेल उधळपट्टी - अर्थतज्ञ संजय खडक्कार

पंचायत समितीनिहाय प्राप्त अर्ज
अकाेला तालुक्यातून २ हजार २७० अर्ज प्राप्त झाले. अकाेटमध्ये १ हजार ९, पातूर २ हजार ९४, बार्शीटाकाळीत २ हजार १२०, मूर्तिजापूरमध्ये २१९, बाळापूर १४१५, तेल्हारा १२०६ असे जिल्ह्यात एकूण १० हजार ३३३ अर्ज प्राप्त झाले.

(संपादन - विवेक मेतकर)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: शुभमन गिलला T20 World Cup संघातून का वगळलं? गौतम गंभीरवर प्रश्नांचा भडीमार अन् मग...

Latest Marathi News Live Update : कोलकाता येथील बांगलादेश उच्चायुक्तालयावर मोर्चा

Crime: सून सासऱ्यासोबत दारू प्यायची; मुलाला राग अनावर झाला, भलताच प्रकार उघडकीस आला, काय घडलं?

निवडणूकांच्या रणधुमाळीत राजकारणावर आधारित ‘आणीबाणी’ आता ओटीटीवर प्रदर्शित; कुठे पाहाल?

Winter Family Vacation Guide: हिवाळ्यात मुलांसोबत ट्रिप प्लॅन करताय? मग आधी 'या' टिप्स नक्की वाचा; एंजॉयमेंट होईल डबल

SCROLL FOR NEXT