Akola Marathi News Prosperous Village Competition District Collector Jitendra Papalkars appeal for villagers to come together 
अकोला

गावाच्या समृद्धीसाठी ‘समृद्ध गाव स्पर्धा’

सकाळ वृत्तसेेवा

अकोला : गावातल्या गावकऱ्यांनी आपापसातले मतभेद विसरून गावाच्या समृद्धीसाठी एकत्र येऊन गावाचा शाश्वत विकासात आपले योगदान द्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी बुधवारी येथे केले.


पाणी फाऊंडेशनच्या वतीने आयोजित समृद्ध गाव स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत जिल्ह्यातील बार्शीटाकळी व अकोट या तालुक्यातील ७७ गावे सहभागी झाली आहेत. 

 यावेळी उपस्थितांना गावातील विहिर पाणी पातळी मोजमाप, जलव्यवस्थापन , कुटुंबनिहाय उत्पन्न वाढ, मृदा व जलसंधारण, पौष्टिक गवताचे कुरण तयार करणे, वृक्ष व जंगल लागवड, मातीचे आरोग्य या व अशा विविध बाबींविषयी माहिती देण्यात आली.

गावाच्या विकासासाठी पानी फाऊंडेशनने आयोजित केलेल्या स्पर्धेचे विविध निकष पुर्ण करण्यासाठी गावातील गावकऱ्यांनी एकत्रित येऊन काम करणे आवश्यक आहे. गावाने एकी केली तर नक्कीच गावाचा विकास होतो.

गावात एकोपा निर्माण होऊन गावासाठी काम केल्याने आपल्याला गावाचे ऋण फेडण्याची संधी मिळते. पाण्यासाठी काम करणे हे आपले राष्ट्र उभारणीचे काम आहे,अशा शब्दात आ. हरिष पिंपळे यांनी मार्गदर्शन केले. या प्रशिक्षणाच्या यशस्वीतेसाठी महेंद्र दामोदर, विद्या अकोडे, मनिष महल्ले व अन्य कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

अकोला जिल्ह्यातील ताज्या बातम्या - क्लिक करा

(संपादन - विवेक मेतकर)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: पुण्यात एकाच वेळी दोघांनी संपवले जीवन, तरुण-तरुणीचे मृतदेह सापडले, घटनेने खळबळ

Latest Marathi News Updates : विजेचा धक्का लागून शेतकऱ्यासह दोन बैलांचा मृत्यू

Mumbai Politics: पलावात आमदारांनी घर घ्यावे, म्हणजे उठलं की जाता येईल, ठाकरे गटाचा शिंदेसेनेच्या आमदारांना टोला

"माझ्या नवऱ्याचे विवाहबाह्य संबंध" पंचायत फेम अभिनेत्यावर पत्नीने केलेले गंभीर आरोप

Demat Account: शेअर बाजाराची क्रेझ कमी होत आहे का? डीमॅट अकाउंट बंद करण्याचे प्रमाण वाढले, काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT