Akola Marathi News Railway will provide land to the corporation Three guntas paid for acquiring 36 guntas of land for Purna-Khandwa railway line 
अकोला

रेल्वे देणार महानगरपालिकेला पावणे तीन कोटी रुपयांचा मोबदला

सकाळ वृत्तसेेवा

अकोला : पूर्णा-खंडवा रेल्वे मार्गासाठी महापालिकेच्या मालकीची ३६ गुंठे जागारेल्वे विभागाने घेतली आहे. या जागेच्या मोबदल्यात रेल्वे विभाग महापालिकेकडे २ कोटी ८१ लाख रुपयाच्या महसुलाचा भरणा करणार आहे. त्यामुळे मनपाच्या तिजोरीत भर पडणार आहे.


अकोला येथून पूर्णा -खंडवा रेल्वे मार्ग महापालिकेच्या डंम्पिग ग्राऊंड जवळून गेला आहे. पूर्वी हा मार्ग मिटरगेज होता. आता या मार्गाचे अकोटपर्यंत ब्रॉडगेजमध्ये रुपांतर करण्यात आले आहे. ब्राॅडगेजसाठी रेल्वे विभागाला डम्पिंग ग्राऊंडवरील महापालिकेच्या मालकीची जागा घ्यावी लागली.

जागा खरेदी करण्याबाबतचे संपूर्ण सोपस्कार पार पडले आहेत. विभागाने जागेची मोजणी करून घेतली आहे. महापालिकेकडून रेल्वे विभागाला ३६ गुंठे जागा घ्यावी लागत आहे. या जागेचे रेडिरेक्नरनुसार दर रेल्वे विभागाला द्यावे लागणार आहेत.

रेल्वे विभागाने खरेदीची प्रक्रिया पूर्ण केली असून, लवकरच ही जागा रेल्वे विभागाच्या नावावर होवून जागेचा मोबदला दोन कोटी ८१ लाख रुपयाचा भरणा केला जाणार आहे.

(संपादन - विवेक मेतकर)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Price Crash : सोनं-चांदी स्वस्त झालं की गुंतवणूक बुडाली? 24 दिवसांत किमतीत तब्बल 60 हजारांची घसरण; काय घडतंय बाजारात? गुंतवणूकदारांचे धाबे दणाणले

US Iran War Victory : अमेरिकेने युद्ध जिंकल्याचा ट्रम्प यांचा दावा, म्हणाले- इराणने आम्हाला मोठं गिफ्ट पाठवलं

Latest Marathi News Live Update : 'आप'चे आमदार पठाणमाजरा यांना ग्वाल्हेरमधून अटक

Hotel Close Ratnagiri : रत्नागिरीत २५० हॉटेलचे ‘शटर बंद’, शिवभोजन थाळीही बंद सर्वसामान्यांची फरफट

IPL 2026: मुंबईत सर्व IPL कर्णधारांची बैठक; इम्पॅक्ट खेळाडू, आचारसंहिता आणि नवीन नियमांची चर्चा होणार

SCROLL FOR NEXT