Akola Marathi News Welcome to the Christian Colony with a tradition of 160 years, the only Christian colony in Vidarbha; Church, lighting on houses 
अकोला

विदर्भातील एकमेव ख्रिश्चन कॉलनी, १६० वर्षांची परंपरा असलेल्या ख्रिश्चन कॉलनीत नाताळाचे स्वागत

सकाळ वृत्तसेवा

अकोला : ख्रिश्चन धर्मियांचा सर्वात मोठा मानला जाणारा पवित्र सण नाताळ केवळ दोन दिवसांवर येऊन ठेपला असून, नाताळाच्या स्वागतासाठी १६० वर्षांची ऐतिहासिक परंपरा असलेल्या विदर्भातील एकमेव ख्रिश्चन कॉलनीमधील घरांवर आणि धार्मिक स्थळांवर चर्च सुंदर रोषणाई करण्यात आली आहे.


नाताळाच्या खरेदीसाठी बाजारात ख्र्रिश्चन धर्मियांनी एकच गर्दी केली होती. ख्रिश्चन कॉलनीमध्ये आकर्षक आकाशदिवे, रंगबिरंगी विद्युत माळांचा झगमगाट करण्यात आला आहे. प्रभू येशू ख्रिस्तांचा जन्मदिन, ख्रिसमस २५ डिसेंबरला अकोल्यासह जिल्ह्यात साजरा करण्यात येणार आहे. सणानिमित्त सजविण्यात आलेले ख्रिसमस ट्री, सांताक्लॉजचे कपडे, भेटवस्तूंचे सर्वांना आकर्षण असते. पालक लहान मुलांना त्यांच्या आवडीनुसार गिफ्ट देतात. सांताक्लॉजच्या भेटीची लहान मुलांना प्रतीक्षा असते.

हेही वाचा - शेतकऱ्यांच्या विश्वासाचं बियाणं करतंय दरवर्षी सहाशे कोटींची उलाढाल, महाबीजचा असा चालतो कारभार

जिल्ह्यात एकूण ३० चर्च
अकोल्यातील ८ चर्च आणि अकोला जिल्ह्यातील एकूण ३० चर्चमध्ये ख्रिसमस सणाची तयारी पूर्ण झाली आहे. शुक्रवार २५ डिसेंबर रोजी संपूर्ण जगभरात प्रभू येशू खिस्तांचा जन्मदिवस खिसमस ( नाताळ) साजरा करण्यात येत आहे. त्यानिमित्त अकोला शहरातील प्रमुख आठ चर्चेस आणि जिल्ह्यातील एकूण ३० चर्चेसमध्ये सकाळी प्रार्थनासभांचे आयोजन करण्यात आले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोजक्याच लोकांना चर्चमध्ये प्रवेश असल्याने लाईव्ह स्क्रीमींगच्या माध्यमातून इतरांना या प्रार्थनासभांमध्ये सहभागी होता येणार आहे.

हे नक्की पहा- आजच्या ताज्या घडामोडींसाठी क्लिक करा

मध्यरात्री केले स्वागत
गुरुवारी मध्य रात्री १२ वाजता फटाके फोडून नाताळाचे जोरदार स्वागत करण्यात आले. ता. २५ डिसेंबर रोजी सर्व चर्चेसमधून सकाळी ९ वाजता प्रार्थना सभांचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी धर्मगुरू बायबल मधील वचनांच्या आधारे खिस्त जन्मावर संदेश देतील. त्यानंतर सलग आठ दिवस सर्व चर्चेसमधून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

हेही वाचा - पाचशे रुपये द्या अन्यथा बाळ देणार नाही, प्रसुती झालेल्या महिलेची रुग्णालयाकडूनच अडवणूक

चर्चवर आकर्षक रोषणाई
अकोला शहरातील अलायन्स मिशन आणि इतर मिशनची असे एकूण ८ चर्चेस असून, नाताळानिमित्त त्या चर्चेसवर सुंदर रोषणाई करण्यात आली आहे. ३१ डिसेंबरला पुन्हा रात्री क्यारोल पार्टी घरोघरी जावून नवीन वर्षाच्या स्वागताची गीते सादर करतील. १ जानेवारीला खिश्चन समाज नवीन वर्ष हादेखील सण साजरा करतो.

(संपादन - विवेक मेतकर)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane News: संतापजनक! शाळेच्या टॉयलेटमध्ये रक्त दिसलं, मासिक पाळीच्या संशयातून मुलींना विवस्त्र केलं अन्...; ठाण्यातील प्रकारानं खळबळ

Video Viral: शुभमन गिलला समोरून जाताना पाहून काय होती सारा तेंडुलकरची रिऍक्शन? पाहा

Viral Video: धक्कादायक! लिफ्टमध्ये लहान मुलाला जबर मारहाण; ठाण्यातील संतापजनक घटना, घटनेचा व्हिडिओ व्हायरल

मराठी चित्रपटसृष्टीच्या मागण्यांबाबत राष्ट्रवादी सांस्कृतिक चित्रपट विभागाने घेतली सांस्कृतिक मंत्र्यांची भेट

धक्कादायक! एकाच कुटुंबातील चौघांचा जीव देण्याचा प्रयत्न, तिघांचा मृत्यू; घटनेमागचं कारण काय?

SCROLL FOR NEXT