Akola Marathi Weather News Dangerous next week! Climate change during the week; Signs of stormy rain with temperature rise 
अकोला

येणारा आठवडा धोक्याचा! आठवडाभरात वातावरण बदल; तापमान वाढीसह वादळी पावसाचे संकेत

सकाळ वृत्तसेेवा

अकोला : फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यातच थंडी काढता पाय घेणार असून, दुसऱ्या आठवड्यात अकोल्यासह विदर्भात काही जिल्ह्यात तापमान वाढ व वादळी पावसाचे संकेत हवामान तज्ज्ञांनी दिले आहेत.


गेल्या वर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडल्याने जमिनीला ओल राहून हिवाळ्यात अधिक गारवा जाणवेल किंवा कडाक्याची थंडी अकोलेकरांना अनुभवाला येईल अशी अपेक्षा होती. परंतु, यंदा थंडीने अकोलेकरांना जणूकाही हुलकावणीच दिली असून, कधी ढगाळ, कधी उष्ण तर कधी तात्पुरता गारवा असे मिश्र वातावरण हिवाळ्यात जाणवत आहे.

गेल्या आवठवड्यात तापमानात वाढ व्हायला सुरुवात झाल्याने २० जानेवारीला तर कमाल ३४.३ अंश सेल्सिअसची नोंद झाली होती. मात्र उत्तरेकडील प्रदेशात थंडी वाढल्याने या भागातून वाहणाऱ्या वाऱ्यांचा गारवा अकोल्यासह विदर्भातही गेल्या तीन ते चार दिवसांपासून अनुभवायला येत आहे. मात्र आठवडाभरात हा गारवा कमी होऊन वातावरणात बदल होण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी वर्तविली आहे. शिवाय पुढील आठवड्यात काही भागात वादळी पावसाची शक्यता सुद्धा वर्तविण्यात आली आहे.

हेही वाचा - Union Budget 2021: अर्थसंकल्पात सरकारला करावी लागेल उधळपट्टी - अर्थतज्ञ संजय खडक्कार

उत्तरेकडून वाहणाऱ्या थंड वाऱ्यांचा परिणाम म्हणून तीन ते चार दिवसांपासून विदर्भात गारवा जाणवत आहे. परंतु, आठवडाभरात वातावरणात बदल होऊन थंडी कमी होत जाईल. त्यानंतर तापमानात वाढीसह काही भागात वादळी पाऊस सुद्धा हजेरी लावू शकतो.
- संजय अप्तुरकर, हवामान तज्ज्ञ, नागपूर

हरभरा, गव्हाला बसू शकतो फटका
वातावरणातील बदल व वादळी पावसाने हजेरी लावल्यास हरभरा व गव्हाच्या पिकाला मोठा फटका बसू शकतो. शिवाय फळ उत्पादनाचे सुद्धा नुकसान होऊ शकते.

(संपादन - विवेक मेतकर)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : आज काँग्रेस करणार महात्मा गांधीच्या पुतळ्याचे रक्षण

Lottery Scam : लॉटरीच्या नावाखाली दाम्पत्याने 600 लोकांना 40 कोटींचा घातला गंडा; लोकांनी 5 ते 10 लाखांपर्यंत केली होती गुंतवणूक

Maharashtra Rain Update News : राज्यात पुन्हा मुसळधार पाऊस, पुढील पाच दिवस महत्वाचे; ११ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी

IT Park:'जमीन पसंत पडेना, आयटी पार्क होईना'; प्रशासनाचा कागदी खेळ, कृषि महाविद्यालयला पर्यायी प्रस्ताव मान्य नाही

Indian Railways: मिनिटाला निघणार दीड लाख तिकिटे; रेल्वे प्रशासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय,आरक्षण केंद्रातील यंत्रणेत बदल

SCROLL FOR NEXT