Akola esakal
अकोला

Akola : ‘मासिक पाळी’ विटंबना नसून वरदान

पूनम बंग : ध्यास बचत गटातर्फे कार्यक्रमाचे आयोजन

सकाळ डिजिटल टीम

कारंजा : ध्यास युवती महिला बचत गट "माय पॅड माय राईट" या प्रकल्पांतर्गत सॅनेटरी पॅडची निर्मिती कारंजा शहरात करत आहे. आज यावर्दी येथील धाबेकर महाविद्यालय येथे आयोजित कार्यक्रमात ध्यास संस्थेच्या अध्यक्षा पुनम बंग यांनी मार्गदर्शन केले.

यामध्ये पुनम बंग यांनी मासिक पाळी या विषयावर बोलताना विद्यालयातील विद्यार्थिनींना सांगितले की, मासिक पाळी ही विटंबना नसून एक वरदान आहे. "ज्या प्रमाणे एका स्त्रिला जर मासिक पाळी आली नाही तर लोक तिला स्वीकारत नाही. मग जी गोष्ट आपल्याला एका स्त्रीचे अस्तित्व प्रदान करते, ती विटंबना होऊच शकत नाही.

मासिक पाळीबाबत स्त्री घरातील पुरुषांपासून बऱ्याच गोष्टी लपवते. मात्र त्यांच्यापासून लपविण्यापेक्षा होणाऱ्या त्रासाची माहिती त्यांना देणं हे आपले कर्तव्य आहे." असे पुनम म्हणाल्या. सोबतच मासिक पाळीत वापरल्या जाणाऱ्या पॅडची योग्य विल्हेवाट कशी लावावी, याबद्दलही मार्गदर्शन करण्यात आले. तसेच ध्यास बचत गटाच्या माध्यमातून निर्मित पॅड विद्यार्थिनींना मोफत वाटण्यात आले.

यावेळी ध्यास संस्थेच्या सचिव धाबेकार यांनी विद्यालयाचे मुख्याध्यापक विजय भड व शिक्षक वृंद, ध्यास संस्थेच्या अध्यक्षा पुनम बंग, एमआरसी अध्यक्षा पुनम कदम, सी आर पी. सुवर्णा व वक्ते यांचे आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भारतीय संघाच्या फिटनेसवर BCCI चा 'सर्जिकल स्ट्राईक'! सीनियर-ज्युनियर पाहू नका, सर्वांना एकच नियम... वाचा BCCI Fitness Standards

मी मराठी नाही, माझं आडनाव राघवन नाही... सुमीत राघवनने पहिल्यांदाच सांगितलं त्याचं खरं नाव; म्हणाला- आम्ही...

SIR Voter List : 'अब्सेंट', 'शिफ्टेड' की 'डुप्लिकेट'? मतदार यादीतील नावांबाबत नवा मेसेज आलाय? घाबरू नका, ही आहे प्रक्रिया

Marathi News Live Updates : जातपडताळणी समिती सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार काम करते, त्यात सरकारचा हस्तक्षेप नाही; जरांगेंच्या आरोपावर फडणवीसांनी स्पष्ट सांगितलं

Gautam Gambhir: श्रीलंका दौऱ्याआधी गंभीरचा टीम इंडियाला स्पष्ट संदेश; “पहिल्या दिवसापासून तयार राहा”, नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT