अकोला

महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांमध्ये ‘फ्री स्टाईल’, वाद पोलिसात

सकाळ वृत्तसेवा

अकोला ः महानगरपालिकेच्या आरोग्य निरीक्षकासोबत सफाई कर्मचाऱ्यांचा वाद ही नित्याचीच बाब आहे. मात्र, आज दोन कर्मचाऱ्यांमधील वाद विकोपाला जाऊन दोघांमध्ये शिविगाळ व हाणामारीपर्यंत पोहोचला. त्यातून परस्पर पोलिस तक्रारी झाल्यात. या घटनेतील जखमी कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी सर्वोपचार रुग्णालयात दुपारी करण्यात आली. रात्री उशिरापर्यंत या प्रकरणी सिटी कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला नव्हता. (Akola Municipal Corporation employees quarrel, dispute with the police)

अकोला महानगरपालिकेतर्फे प्रत्येक प्रभागाकरिता आरोग्य निरीक्षक नियुक्त करण्यात आले आहे. सफाईच्या कामांसाठी नियुक्त कर्मचाऱ्यांची उपस्थिती नोंदविण्याचे काम सकाळी आरोग्य निरीक्षक करतात.

यावरून तहसील कार्यालय परिसरात दोन कर्मचाऱ्यांमध्ये चांगलाच वाद झाला. त्यात एका कर्मचारी संघटनेच्या नेत्यांच्या मुलाचाही समावेश आहे. त्याने दगड मारून दुसऱ्या कर्मचाऱ्याला जखमी केले. तर कर्मचारी संघटनेच्या नेत्याच्या मुलानेही मारहाणीत हाताला दुखापत झाल्याचा आरोप केला आहे. हा प्रकरणी दोन्हीकडून सिटी कोतवाली पोलिस स्टेशनमध्ये परस्पर विरोधी तक्रार दाखल करण्यात आल्या आहेत.

संपादन - विवेक मेतकर

Akola Municipal Corporation employees quarrel, dispute with the police

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hindu Temple Entry Law : जन्माने हिंदू नसाल तर मंदिरात प्रवेश मिळणार नाही? हायकोर्टाने दिला महत्त्वाचा निर्णय

Solapur News: सोलापूरकरांना महागाईचा आणखी एक झटका! १ जुलैपासून कटिंग १३०, दाढी ७० रुपये; नाभिक संघटनेची १०% दरवाढ

Jalindar Kamthe Passes Away: पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर कामठे यांचे निधन; राजकीय, शैक्षणिक क्षेत्रात शोककळा, जिल्ह्यात हळहळ..

Paud Agriculture Day: पौड येथे कृषी दिन उत्साहात साजरा; वसंतराव नाईक जयंतीनिमित्त शेतकरी सन्मान व योजनांवर मार्गदर्शन

Food Safety: फ्रिजमधील जेवण पुन्हा-पुन्हा गरम करताय ? या '५' पदार्थांच्या बाबतीत चूक करू नका !

SCROLL FOR NEXT