Akola News: Agitations against Central Government Bills, Holi in Akola, Washim, Buldhana District 
अकोला

कृषी विधेयकांविरोधात अर्धनग्न आंदोलन, अकोला, वाशीम, बुलढाणा जिल्ह्यात विधेयकाची होळी

मनोज भिवगडे

अकोला :  केंद्र शासनाने संसदेत नुकतीच शेतकऱ्यांबाबत तीन विधेयके मंजूर केली आहेत. ही विधेयके शेतकरी विरोधी असल्याने याचा विरोध करण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी वऱ्हाडातील अकोला, बुलडाणा आणि वाशीम या तिन्ही जिल्ह्यात रस्त्यावर उतरत आंदोलन केले. या विधेयकांच्या प्रतिची कार्यकर्त्यांनी होळी केली.

अकोल्यात निंबा फाटावर होळी
अकोला जिल्हा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने केंद्र सरकारच्या कृषी विधेयकांविरोधात निंबा फाटा येथे सभा घेत होळी करण्यात आली. कॉर्पोरेट कंपन्यांच्या दावणीला शेतकऱ्यांना बांधण्याचे काम हे केंद्र सरकार करीत आहे. केंद्र सरकार शेतकऱ्यांना वेठीस धरू शकत नाही.

त्यासाठी देशभर आंदोलन छेडण्यात आल्याची माहिती यावेळी जिल्हाध्यक्ष गणेश खुमकर यांनी दिली. यानंतर खुमकर यांनी विधेयकांची होळी केली. यावेळी पंकज दुतंडे, विष्णू निर्मल, रवी क्षीरसागर, प्रवीण दामोदर, साबिर शहा, सचिन दामोदर, विकास दामोदर, गजानन मोळक, मंगेश राठोड, सचिन निर्मळ, अजय दामोदर, राजू प्रधान, गणेश भटकर यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.


बुलडाण्यात तुपकरांनी केली होळी
केंद्र सरकारने बहुमताच्या जोरावर शेतकऱ्यांच्या विरोधात तीन विधेयके संसदेत पारीत केली आहेत. या कायद्याला विरोध म्हणून बुलडाणा जिल्ह्यात सावळा फाटा येथे शेतात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात आंदोलन झाले. तुपकर व कार्यकर्त्यांनी या तिनही बिलांची होळी केली. ही कृषी विधेयके आणून केंद्र सरकार हमीभावाच्या कायद्यातुन पळ काढीत आहे. शेतकऱ्यांना कॉरिटच्या दारात उभे करीत असल्याचा आरोप तुपकर यांनी यावेळी केला.


वाशीममध्ये अर्धनग्न आंदोलन
वाशीम जिल्ह्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी विदर्भ प्रमुख दामोदर इंगोले यांच्या नेतृत्वात अर्धनग्न आंदोलन केले. कार्यकर्त्यांनी चौकात एकत्र येत शेतकरी विरोधी बिलाची होळी केली. यावेळी बालाजी मोरे, विशाल गोटे , गोपाल भिसाडे, विनोद भिसाडे,
निलेश थोरात ,राहुल धामणे यांच्यासह इतर कार्यकर्ते सहभागी झाले होते.

(संपादन - विवेक मेतकर)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

High Court Verdict: सेक्सनंतर जन्मकुंडलीचा बहाणा करून लग्न नाकारणे हा गुन्हा; दिल्ली उच्च न्यायालयाचा स्पष्ट निकाल

IPO Market: रिन्यूएबल एनर्जी क्षेत्रातील दिग्गज कंपनीचा ₹31,000 कोटींचा IPO बाजारात! गुंतवणूक करण्याआधी वाचा डिटेल्स

Video : राजवाडेंमुळे आनंद उचलणार टोकाचं पाऊल ? प्रोमो पाहून प्रेक्षक अस्वस्थ "हा समर डोक्यावर पडलाय"

RTE Reimbursement: आरटीई अनुदान रखडल्याने शाळांची कोंडी; पाच वर्षांपासून ९५ कोटी थकीत, न्यायालयीन आदेशाची पायमल्ली?

'आतल्या आत घुसमटत...' नागा चैतन्यसोबतच्या घटस्फोटाबद्दल पहिल्यांच बोलली समांथा, म्हणाली...'माझा डिव्होर्स झाला, तेव्हा…'

SCROLL FOR NEXT