Akola News: Another dies; The number of 47 new positive, active patients reached 791 
अकोला

आणखी एकाचा मृत्यू; ४७ नवे पॉझिटिव्ह, ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या पोहचली ७९१ वर

सकाळ वृत्तसेेवा

अकोला : कोरोनामुळे होणाऱ्या कोविड १९ रोगाने रविवारी (ता. २०) आणखी एका रुग्णाचा मृत्यू झाला. त्यासह ४७ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना बळींची संख्या ३११ झाली असून एकूण ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या ७९१ झाली आहे.

जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत आहे. शनिवारी (ता. १९) कोरोनामुळे चार रुग्णांचा मृत्यू झाला असतानाच रविवारी (ता. २०) आणखी एका रुग्णाचा बळी गेला. संबंधित रुग्ण खासगी रुग्णालयात उपचार घेत होता. सदर रुग्ण दहिगाव ता. तेल्हारा येथील ६७ वर्षीय पुरूष होता. त्याला १८ डिसेंबर रोजी दाखल करण्यात आले होते.

दरम्यान रविवारी (ता. २०) कोरोना संसर्ग तपासणीचे ४९६ अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी ४७ अहवाल पॉझिटिव्ह तर ४४९ अहवाल निगेटिव्ह आले. सकाळी ४४ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात १३ महिला व ३१ पुरुषांचा समावेश आहे. त्यातील केशव नगर येथील पाच, राम नगर येथील चार, रणपिसे नगर, कौलखेड, गौरक्षण रोड व खेतान नगर येथील प्रत्येकी तीन जण, सिध्दी कॅम्प व बिर्ला रोड येथील प्रत्येकी दोन जण, तर उर्वरित मूर्तिजापूर, आरोग्य नगर, जीएमसी हॉस्टेल, मोठी उमरी, उरळ ता. बाळापूर, कृषी नगर, पत्रकार कॉलनी, आळशी प्लॉट, तोष्णीवाल ले०-आऊट, तापडीया नगर, तेल्हारा, हरिश कॉलनी, छोटी उमरी, डोंगरगाव, आदर्श कॉलनी, पारस, अकोट, सिंधी कॅम्प व रतनलाल प्लॉट येथील प्रत्येकी एक प्रमाणे रहिवासी आहे. सायंकाळी तिघांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यात तीन पुरुषांचा समावेश असून दोन गोरक्षण रोड येथील तर मोठी उमरी येथील एक याप्रमाणे रहिवाशी आहे.


१७ जणांना डिस्चार्ज
कोरोनावर मात करणाऱ्या १७ जणांना रविवारी डिस्चार्ज देण्यात आला. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून १२, आयकॉन हॉस्पीटल येथून एक, बिहाडे हॉस्पीटल येथून तीन तर यूनिक हॉस्पिटल येथील एका रुग्णाचा समावेश आहे.

कोरोनाची सद्यस्थिती
- एकूण पॉझिटिव्ह - १०१६९
- मृत - ३११
- डिस्चार्ज - ९०६७
- ॲक्टिव्ह रुग्ण - ७९१

(संपादन - विवेक मेतकर)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: ''मोदींमार्फत अल्लाने सगळं दिलंय, कुणाची मदत नको'' अपंग असलेल्या मुस्लिम व्यक्तीचा व्हिडीओ व्हायरल

माेठी बातमी! 'सातारा जिल्ह्यातील आमदार आठ महिने निधीविनाच'; फंडातील विविध कामांना ब्रेक, अधिवेशनात घोषणेची शक्यता

Viral Video: नवरा फोनमध्ये व्यस्त, पत्नी संतापली, रागात असं काही केलं की...; व्हिडिओच व्हायरल झाला, पाहा पोस्ट

Ashadhi Wari 2025: मृदंगाच्या थापाने वाढविली वारकऱ्यांची ऊर्जा; घळाटवाडीच्या गणेश महाराजांची पंढरीच्या वारीत वादनसेवा

Tata Group: टाटा ग्रुपच्या कंपनीचा शेअर 10 टक्क्यांनी घसरला; ब्रोकरेजनेही दिला अलर्ट, गुंतवणूकदार चिंतेत

SCROLL FOR NEXT