Akola News: Bail application of three accused in Tushar Pundkar case rejected 
अकोला

तुषार पुंडकर हत्याकांडातील तीन आरोपींचा जामीन अर्ज नामंजूर

सकाळ वृत्तसेेवा

अकोट (जि.अकोला) ः अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश मनीष गणोरकर यांनी अकोट येथील प्रहार जनशक्तीचे नेते तुषार पुंडकर हत्याकांडातील आरोपींचा जामीम अर्ज नामंजूर केला आहे.


हत्याकांडातील आरोपी शुभम हमीचंद जाट, गुंजन देविदास चिंचोळे, व शहाबाज खान इस्माइल खान हे अकोला कारागृहात बंदिस्त आहेत. त्यांनी जामीण मिळविण्यासाठी अर्ज केला होता. त्यावर न्यायालयात मंगळवारी सुनावणी झाली. या प्रकरणात सरकारतर्फे सरकारी वकील अजित देशमुख यांनी न्यायालयात युक्तिवाद केला.

यावर्षीच्या सुरुवातीला २१ फेब्रुवारी रोजी रात्री १० वाजताचे दरम्यान आकोट शहर पोलिस स्टेशन जवळ तुषार पुंडकर यांच्यावर गावठी पिस्तूल मधून गोळ्या झाडून आरोपींनी कटकारस्थान करून संगनमताने त्यांचा खून केला होता.

या प्रकरणात एकूण ७ आरोपींना अटक करून तपास करून दोषारोपपत्र विद्यमान न्यायालयात दाखल करण्यात आले आहे. त्यापैकी वरील तीन आरोपीनी जमानत मिळण्याकरिता अर्ज विद्यमान कोर्टात दाखल केला होता.

(संपादन - विवेक मेतकर)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India Pakistan Border Security : पाकिस्तान, बांगलादेश सीमेवर ६ हजार किमीची भींत, शत्रुला रोखण्यासाठी गृहमंत्री अमित शाहांकडून नव्या प्रकल्पाची घोषणा

Narendra Modi: ''लोकांच्या आयुष्यात सरकारचा हस्तक्षेप नको'', मंत्रिमंडळ बैठकीत पंतप्रधान मोदी नेमकं काय म्हणाले?

SRH vs RCB Live: रसिख दारच्या 'यॉर्कर'ने ट्रॅव्हिस हेडचा त्रिफळा उडवला, विराट कोहली कसला पेटला... सेलिब्रेशन एकदा पाहाच Video

IPL 2026 : KKR ला मोठा धक्का! सर्वाधिक धावा करणारा फलंदाज स्पर्धेतून बाहेर; प्ले ऑफच्या शर्यतीत आता तग कसा धरणार?

काँग्रेसकडून जिल्हाध्यक्षांची नियुक्ती! पक्षाकडून नव्या चेहऱ्यांना संधी; ६९ जणांचा समावेश

SCROLL FOR NEXT