Akola News Be careful when transacting online, otherwise fraud can occur 
अकोला

ऑनलाइन व्यवहार करताना सावधगिरी बाळगा, अन्यथा होऊ शकते फसवणूक

संतोष गिरडे

शिरपूर जैन (जि.वाशीम) : मोबाईल वरून ऑनलाईन व्यवहार करताना अनेकांची फसवणूक होत असल्याचे निदर्शनास आले आहे. सायबर गुन्हेगार अनेकांच्या खात्यातून हजारो रुपयांची रक्कम कळत-नकळत वळती करीत आहेत. बँकेतून बोलतो, पेटीएम ची केवायसी करून देतो, एटीएम कार्ड ब्लॉक झाले आदीं विविध शक्कल लढवून सायबर गुन्हेगार नागरिकांची फसवणूक करतात. यामुळे नागरिकांनी ऑनलाइन व्यवहार करताना सावधगिरी बाळगणे गरजेचे झाले आहे.

बहुतांश जणांकडे महागडे अँड्रॉईड फोन आहेत. हे महागडे स्मार्टफोन वापर करणाऱ्यांची सायबर गुन्हेगारांकडून फसवणूक केली जाते. बतावणी करणाऱ्यांवर विश्वास न ठेवण्याचे आव्हान पोलिस विभाग नेहमी करत असतानाही उच्च शिक्षितांसह अनेकांची फसवणूक होत आहे. सायबर फसवणूक करणाऱ्यांनी अनेकांची फसवणूक केली आहे, अशी उदाहरणे बरीचशी पाहायला मिळतात. कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सध्या लॉकडाउनची स्थिती आहे.

अनेकांच्या हातची कामे कमी झालीत. त्यामुळे या रिकाम्या वेळेचा फायदा घेऊन सायबर गुन्हेगारांनी डोके वर काढले आहे. एटीएम, फ्रॉड, ईमेल आदी माध्यमांचा वापर करून नागरिकांची फसवणूक केल्या जात आहे. फसवणूक झाल्याची नागरिकांच्या लक्षात येताच, ते सायबर सेल गाठून तक्रार करतात. सोशल मीडिया, ई-मेलवरून, क्रेडिट कार्ड द्वारे, तसेच इतर मार्गाने फसवणूक होत आहे. अशी फसवणूक टाळण्यासाठी नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे आहे. फेसबुक व व्हाट्सऍप वरून फोटो वायरल करणे, बनावट खाते खाते उघडून फसवणूक करण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. तुमचे एटीएम कार्ड ब्लॉक झाले आहे. त्यामुळे तुमची सेवा बंद होईल. कार्ड बदल बदलविण्याकरिता ओटीपी क्रमांक मागण्यात येतो, मोबाईल वरून संदेश देत कॉल ही करण्यात येतो. त्याला नागरिक बळी पडत कुठलाही विचार न करता ओटीपी देतात, त्यानंतर सदर व्यक्तीच्या खात्यातून रक्कम काढण्यात येते. असे अनेक प्रकार होताना पाहायला मिळतात. त्यामुळे ऑनलाईन व्यवहार करतांना ते सावधगिरीने करणे आवश्यक आहे.
----------------------------------
सायबर गुन्ह्यात होता आहे वाढ
चुकीचे फोन किंवा मॅसेज करून ग्राहक त्याला बळी पडतात. त्यामुळे अनेकवेळा ऑनलाईन व्यवहार करताना नागरिकांची आर्थिक फसवणूक होत असल्याच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत. फसवणूक झाल्यानंतर पोलिसा ठाण्यात जाऊन तक्रार देऊन आरोपींचा शोध घेण्याचे काम सायबर सेलच्या मागे लावल्या जात आहे. अनेक वेळा आव्हान करून देखील नागरिक अशा फसव्या लिंक, मॅसेज, कॉल ला बळी पडत असल्याने सायबर सेल वाल्यांच्या जबाबदारीत आणखी भर पडत आहे.

अकोला, बुलढाणा, वाशिम जिल्ह्यातील ताज्या बातम्या - क्लिक करा

संपादन - विवेक मेतकर

अधिक वाचा - 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: हा व्हिडिओ खास आहे... नातं रक्ताचं नव्हतं, पण... जंगलात वाजली शहनाई, CRPF जवानांनी निभावलं वधूच्या भावाचं कर्तव्य

Ashadhi Wari 2025 : बंधुभेटीच्या सोहळ्याने अवघे वैष्णव भावुक; संत ज्ञानेश्वर महाराज-संत सोपानदेवांच्या भेटीचा सोहळा अनुभवण्यासाठी गर्दी

Satara Crime : धोमच्या चोरीप्रकरणी एकास अटक; नवनाथ दत्त मंदिरातील दानपेटी फोडून रोख रक्कम लंपास

Public Health Corruption: आरोग्य खात्यात साहित्य खरेदीत गैरव्यवहार; आमदार डाॅ. राहुल पाटील यांचा विधानसभेमध्ये आरोप

Latest Maharashtra News Updates : अमित शहांचा आज पुणे दौरा, वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT