esakal | मन हेलावून टाकणारी घटना; मळणी यंत्रात अडकला तरूण, गतिमंद भावासह विधवा आईवर कोसळला दुखःचा डोंगर
sakal

बोलून बातमी शोधा

Buldana Marathi News A young man from Ghatbori died in a threshing machine

समाधानच्या घरची परिस्थिती अतिशय बिकट असून, वडिलाचा गंभीर आजाराने सहा महिन्याअगोदर मृत्यू झाला तर लहान भाऊ गतिमंद असल्यामुळे घराची जबाबदारी समाधानवर येऊन ठेपली होती.

मन हेलावून टाकणारी घटना; मळणी यंत्रात अडकला तरूण, गतिमंद भावासह विधवा आईवर कोसळला दुखःचा डोंगर

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

घाटबोरी (जि.बुलडाणा) : मेहकर तालुक्यामधील सोनाटी येथे आज (ता. 25) हरभरा पिकांची काढणी सुरू असताना हात मजुरीवर पोट असणार्‍या युवकाचा काम करीत असताना ट्रॅक्टर मळणीयंत्रात अडकून मृत्यू झाला.

समाधानच्या घरची परिस्थिती अतिशय बिकट असून, वडिलाचा गंभीर आजाराने सहा महिन्याअगोदर मृत्यू झाला तर लहान भाऊ मतिमंद असल्यामुळे घराची जबाबदारी समाधानवर येऊन ठेपली होती.

घरात विधवा आई, गतिमंद भाऊ त्यामुळे समाधान मोलमजुरी करत होता. वडिलांच्या मृत्यूनंतर घराची संपूर्ण जबाबदारी पेलत होता. विधवा आईचा दवाखाना, मतिमंद भावाची खाण्यापिण्याची जबाबदारी या कोरोनाच्या संकटामध्ये सुद्धा कधी काम होते कधी काम मिळत नव्हते अशा कठीण परिस्थितीत समाधान काबाडकष्ट करत होता.
 

हेही वाचा - बुलाती है मगर जाने का नही, प्रतिष्ठीत पुरुषांना अडकविण्यासाठी रचला जातो हनी ट्रॅप

समाधान रमेश गिरी (वय 22 वर्ष) हे त्या युवकाचे नाव. तो दत्ता किसन बदर यांच्या असलेल्या ट्रॅक्टर मळणीयंत्रावर हरभरा काढणीसाठी कामावर होता. नंदकिशोर बदर यांच्या शेतातील हरभरा पिकांची काढणी चालू असताना दुपारी अंदाजे 12. 30 दरम्यान सोनाटी शिवारात अचानक समाधान गिरी मळणी यंत्राच्या टपात गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.

हेही वाचा -  जी.श्रीकांत गेले ; राहुल रेखावार महाबीजचे नवे एमडी

या हृदयद्रावक घटनेने सोनाटी गावातील अनेकांचे डोळे पाणावले. त्या विधवा आई व गतिमंद भावावर या घटनेमुळे दु:खाचा डोंगर कोसळला. याबाबतची माहिती सोनाटीचे सरपंच कुंदन होले यांनी सकाळ ला देत हळहळ व्यक्त केली.

अकोला, बुलढाणा, वाशिम जिल्ह्यातील ताज्या बातम्या - क्लिक करा

संपादन - विवेक मेतकर

अधिक वाचा - 

0

कोरोनामुळे उडू शकणार नाही ड्रोन!

0

70 फुट खोल विहिरीत तरंगत होता मृतदेह, रात्री दोन वाजता सुरू झाले सर्च ऑपरेशन

0

Video: अपघातात आले अपंगत्व, उपचारालाही पैसे नाहीत, अठराविश्व दारीद्र्याचा अनुसुया ओढते गाढा

0

पेट्रोल पंप दुपारी तीनपर्यंत सुरू, औषध दुकाने नियमित वेळेत

0

चार अधिकाऱ्यांना पोलिस निरीक्षकपदी पदोन्नती !

0

धोक्याची घंटा; निवासी शाळेतील 229 विद्यार्थ्यांसह चार शिक्षकांनाही कोरोनाची लागण

loading image