esakal | जी.श्रीकांत गेले ; राहुल रेखावार महाबीजचे नवे एमडी

बोलून बातमी शोधा

Akola News G. Srikanth replaced; Rahul Rekhawar is the new MD of Mahabeej}

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक पदाबाबत संगीत खुर्चीचा खेळ सुरू आहे. एक दिवसांसाठी या पदावर अकोल्यात रूजू झालेले जी. श्रीकांत यांची शासनाने औरंगाबादला बदली केल्याने आता राहूल रेखावार यांना नियुक्त केले आहे.

जी.श्रीकांत गेले ; राहुल रेखावार महाबीजचे नवे एमडी
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक पदाबाबत संगीत खुर्चीचा खेळ सुरू आहे. एक दिवसांसाठी या पदावर अकोल्यात रूजू झालेले जी. श्रीकांत यांची शासनाने औरंगाबादला बदली केल्याने आता राहूल रेखावार यांना नियुक्त केले आहे.


डिसेंबरमध्ये अनिल भंडारी यांची बदली झाल्यानंतर जी. श्रीकांत यांच्या नियुक्तीचे आदेश काढण्यात आले होते. श्रीकांत यांना सुरुवातीपासूनच हे पद नको असल्याने ते बरेच दिवस रूजूच झाले नव्हते. त्यामुळे हा पदभार जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्याकडे सोपविण्यात आला.

हेही वाचा -बुलाती है मगर जाने का नही, प्रतिष्ठीत पुरुषांना अडकविण्यासाठी रचला जातो हनी ट्रॅप

दरम्यानच्या काळात दुसार पर्याय न मिळाल्याने अखेरीस श्रीकांत हे ता. १७ फेब्रुवारीला रूजू होण्यासाठी अकोल्यात आले. त्यांनी पदभार घेत आढावाही घेतला. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी प्रशिक्षणाला निघून गेले. आता बुधवारी (ता.२४) त्यांच्या बदलीचाच आदेश महाबीज मुख्यालयात दाखल झाला. श्रीकांत यांना औरंगाबाद येथे सेल्स टॅक्स विभागात नियुक्ती देण्यात आली असून, त्यांच्या या रिक्त पदावर राहूल रेखावार यांना नेमण्यात आले.

श्री. रेखावार हे २०११च्या बॅचचे आयएएस दर्जाचे अधिकारी आहेत. श्री. रेखावार आता हा पदभार स्वीकारतात की नाही, याबाबत अद्याप कोणीही ठोस सांगत नाही. कदाचित मार्चच्या पहिल्या आठवड्यात ते रूजू होतील, अशी महाबीजच्या वर्तुळात चर्चा आहे.

अकोला, बुलढाणा, वाशिम जिल्ह्यातील ताज्या बातम्या - क्लिक करा

संपादन - विवेक मेतकर

अधिक वाचा - 

0

कोरोनामुळे उडू शकणार नाही ड्रोन!

0

70 फुट खोल विहिरीत तरंगत होता मृतदेह, रात्री दोन वाजता सुरू झाले सर्च ऑपरेशन

0

Video: अपघातात आले अपंगत्व, उपचारालाही पैसे नाहीत, अठराविश्व दारीद्र्याचा अनुसुया ओढते गाढा

0

पेट्रोल पंप दुपारी तीनपर्यंत सुरू, औषध दुकाने नियमित वेळेत

0

चार अधिकाऱ्यांना पोलिस निरीक्षकपदी पदोन्नती !

0

धोक्याची घंटा; निवासी शाळेतील 229 विद्यार्थ्यांसह चार शिक्षकांनाही कोरोनाची लागण