akola news Corona found three more deaths, 272 new patients 
अकोला

कोरोनाने आणखी तिघांचा मृत्यू, २७२ नवे रूग्ण आढळले

सकाळ वृत्तसेेवा

अकोला ः कोरोनामुळे होणाऱ्या कोविड १९ रोगाने ग्रस्त तीन रूग्णांचा शुक्रवारी (ता. ९) मृत्यू झाला. याव्यतिरिक्त २७१ नवे रूग्ण आढळले. त्यामुळे सध्या जिल्ह्यातील ॲक्टिव्ह रूग्णांची संख्या ३ हजार ८२१ झाली आहे. शुक्वरारी एकूण २१९ जणांचा डिस्चार्ज सुद्धा देण्यात आला.

कोरोना संसर्ग तपासणीचे १ हजार ७८६ प्राप्त झाले. त्यापैकी १ हजार ६१५ अहवाल निगेटिव्ह तर १७१ अहवाल पॉझिटिव्ह आले. रॅपिडच्या चाचणीत १०१ अहवाल पॉझिटिव्ह आल्याने शुक्रवारी (ता. ९) एकूण २७२ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले. त्यासोबतच तीन रूग्णांचा मृत्यू सुद्धा झाला. त्यात पहिला रूग्ण पोळा चौक, अकोला येथील ४४ वर्षीय पुरुष होते. या रुग्णास ८ एप्रिल रोजी दाखल करण्यात आले होते. दुसरा मृत्यू कौलखेड येथील ६६ वर्षील पुरुष रुग्णाचा झाला. त्याला २ एप्रिल रोजी दाखल करण्यात आले होते. तिसरा मृत्यू सायंकाळी खासगी रुग्णालयात मोठी उमरी येथील ६५ वर्षीय पुरुष रुग्णाचा झाला. या रुग्णास ८ एप्रिला रोजी दाखल करण्यात आले होते. सदर तीन मृत्यूनंतर आतापर्यंत जिल्ह्यात बळी पडलेल्या एकूण रूग्णांची संख्या ४९२ झाली आहे.

हेही वाचा - व्यापाऱ्यांनी झुगारला लॉकडाउन!, शहरातील अनेक दुकाने उघडी
--------------------
या भागात आढळले नवे रूग्ण
सकाळी १२६ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात ५२ महिला व ७४ पुरुष यांचा समावेश आहे. त्यात अकोट येथील १०, डाबकी रोड येथील आठ, जीएमसी येथील ६ व इतर भागातील रहिवाशी रूग्णांचा समावेश आहे. सायंकाळी ४५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात १४ महिला व ३१ पुरुष रुग्णांचा समावेश आहे. त्यात मूर्तिजापूर येथील आठ, महागाव बु. येथील ६ व जिल्ह्यातील इतर भागातील रहिवाशी रूग्णांचा समावेश आहे.
-----------
कोरोनाची सद्यस्थिती
- एकूण पॉझिटिव्ह - ३०१२८
- मृत - ४९२
- डिस्चार्ज - २५८१५
- ॲक्टिव्ह रूग्ण - ३८२१
(संपादन - विवेक मेतकर)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Subhanshu Shukla meet PM Modi : शुभांशू शुक्ला यांनी पंतप्रधान मोदींना दिली ‘ती’ खास भेटवस्तू ; जाणून घ्या, मोदी काय म्हणाले?

Nanded Rain : मुखेडमध्ये ३०० जणांना वाचविले; नांदेडमध्ये पावसाचा धुमाकूळ, ९ जण बेपत्ता, म्हशींसह ७० जनावरे गेली वाहून

Eleventh Admission : अकरावीच्या ‘सर्वांसाठी खुल्या’ फेरीअंतर्गत प्रवेशासाठी २२ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

Pune News : नेत्यांची वेळ न मिळाल्याने पुण्यातील उड्डाणपुलांचे उद्‍घाटन रखडले

इतिहासाची अमूल्य खुण भारतात! इतिहासाशी पुन्हा जोडणारा क्षण, मुख्यमंत्री फडणवीसांची भावनिक प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT