Akola News: Corona Update; 45 new patients positive; Up to 500 active patients 
अकोला

कोरोना अपडेट; ४५ नवे रुग्ण पॉझिटिव्ह; ॲक्टिव्ह रुग्ण ५०० वर

सकाळ वृत्तसेेवा

अकोला  ः कोरोना संसर्गाचे ४५ नवे रुग्ण पॉझिटिव्ह आढळले. त्यामुळे जिल्ह्यातील ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या ५०३ झाली असून आतापर्यंत एकूण पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांची संख्या ९ हजार १२० झाली आहे. दरम्यान कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असल्याने नागरिकांनी खबरदारी घेणे आवश्यक आहे.

कोरोना संसर्ग तपासणीचे मंगळवारी (ता. २४) ६३२ अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी ४५ अहवाल पॉझिटिव्ह तर ५८७ अहवाल निगेटिव्ह आले. नव्याने पॉझिटिव्ह आढळलेले रुग्णांमध्ये सकाळी ३४ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले.

हेही वाचा - अफलातून; शिक्षक उमेदवारानी लावली शर्ट बनियानवर लग्नसंमारंभात हजेरी

त्यात सहा महिला व २८ पुरुषांचा समावेश आहे. त्यातील राम नगर व सहकार नगर येथील प्रत्येकी तीन, मलकापूर, तापडीया नगर व कौलखेड येथील प्रत्येकी दोन, तर उर्वरित सुधीर कॉलनी, पातूर, मोठी उमरी, चोहट्टा बाजार, जवाहर रोड, बहिणाबाई खरोटे कन्या विद्यालय, उमरी, पळसो बढे, जठारपेठ, देवरावबाबा चाळ, अकोट, गजानन महाराज मंदिर खदान, बाळापूर, पारस, रामदासपेठ, गोरक्षण रोड, देशमुख फैल, रणपिसे नगर, चिंचोली ता. बाळापूर, सिंधी कॅम्प, जोगळेकर प्लॉट व सांगवी बाजार येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहे.

हेही वाचा - VIDEO: प्रेरणादायी: भिंती बोलू लागल्या! आदर्श गावाची कहाणी थक्क करणारी कहाणी

त्यासह सायंकाळी ११ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात पाच महिला व सहा पुरुषांचा समावेश आहे. त्यातील परिवार कॉलनी व अकोट फैल येथील प्रत्येकी दोन, तर उर्वरित रिंग रोड, गोकूल कॉलनी, शिवाजी नगर, जठारपेठ, विद्युत नगर, सिंधी कॅम्प व शंकर नगर येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहे.

२४ जणांना डिस्चार्ज
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून १२, आयकॉन हॉस्पीटल येथून दोन, हॉटेल रिजेन्सी येथून एक तसेच होम आयसोलेशनचा कालावधी पूर्ण करणाऱ्या ९ जणांना, अशा एकूण २४ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

हेही वाचा - अरे बापरे!  प्राचार्यांनीच केली प्राध्यापिकेला शरीरसुखाची मागणी

आता सद्यस्थिती
- एकूण पॉझिटिव्ह - ९१२०
- मृत - २८८
- डिस्चार्ज - ८३२९
- ॲक्टिव्ह रुग्ण - ५०३

(संपादन - विवेक मेतकर)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dengue Cases: डेंग्यूने १२ वर्षीय सोहमचा बळी; वडील अन् बहीणही अतिदक्षता विभागात, सहा दिवस शीतगृहात ठेवावा लागला मृतदेह

Marathi News Live Updates : गणेशोत्सवात पुण्याच्या मध्यवर्ती भागातील बारा प्रमुख रस्त्यांवर जड वाहनांना बंदी

BJP: भाजपमधून १३ पदाधिकाऱ्यांचे निलंबन अखेर मागे, पुन्हा पक्षकार्याची संधी

Mira Bhayandar Paryushan Controversy : भाजप आमदारांचा अजब फतवा! विद्यार्थ्यांच्या डब्यात कांदा-लसूण नको, पर्यूषण पर्व काळात पालकांना शाळेचा मेसेज, राजकीय वाद पेटला

Indian Army Success Story: शेतकरी कुटुंबातील हर्षची भरारी! वयाच्या २४व्या वर्षी भारतीय सैन्यात लेफ्टनंट; आई गृहिणी, वडील शेतकरी, मुलाची प्रेरणादायी काहाणी

SCROLL FOR NEXT