akola news Curfew and curfew imposed from 9 pm to 6 am 
अकोला

रात्री ९ ते सकाळी ६ वाजेपर्यंत जमावबंदी व संचारबंदी लागू

सकाळ वृत्तसेेवा

अकोला  ः जिल्ह्यातील कोविड-१९ चा प्रार्दुभाव लक्षात घेवून प्रतिबंधात्मक उपाययोजनेअंतर्गत जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागात रात्रीचे ९ वाजतापासून ते सकाळी ६ वाजेपर्यंत रात्रीची जमावबंदी व संचारबदी लागू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी निर्गमित केले आहेत. याकाळात अत्यावश्यक सेवा वगळता इतरांना मुक्त संचार करता येणार नाही.
------------
संचारबंदीतून यांना मुभा
शासकीय तसेच खाजगी ॲम्बुलन्स सेवा, रात्रीच्या वेळेस सुरू राहणारी औषधीची दुकाने, कर्तव्यावरील पोलिस व आरोग्य तसेच आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित व्यक्ती किंवा वाहने, कर्तव्यावरील रुग्ण वाहतूक व हॉस्पीटल मधील डॉक्टर व पॅरामेडिकल स्टाफ, अत्यावश्यक सेवा, वीज, पाणी पुरवठा, दुरसंचार, औषधींची वाहने, अग्नीशमन, बँक व एटीएममध्ये पैसे भरणारी वाहणे व कर्तव्यावरील अधिकारी व कर्मचारी, जीवनावश्यक वस्तुची सेवा, वस्तू व माल यांची वाहतूक व कर्तव्यावरील अधिकारी व कर्मचारी, प्रसार माध्यम व त्यांचे प्रतिनिधी, वृत्तपत्र छपाई व वृत्तपत्र विक्रेते, रात्रीच्या वेळेस सुरू राहणारे पेट्रोल पंप व हायवेवरील पेट्रोल पंप व ढाबे, रेल्वेने तसेच एसटी बस व प्रायव्हेट लक्झरीने उतरणाऱ्या प्रवाशांसाठी ऑटोरिक्षा. तसेच जिल्हादंडाधिकारी यांनी परवानगी दिलेली वाहने व अधिकारी, कर्मचारी, व्यक्ती यांना संचारबंदीच्या कालावधीत मुभा राहिल.
---------------------
आदेश भंग केल्यास फौजदारी कारवाई
संचारबंदी व जमावबंदीच्या आदेशाचे उल्लंघ करणारे संबंधित व्यक्ती, संस्था व संघटना यांच्यावर गुन्हे दाखल करण्यासाठी संबंधित पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक दर्जापेक्षा कमी नाही अशा अधिकाऱ्यास प्राधिकृत करण्यात आले आहे. तसेच जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागात आदेशाचा भंग करणाऱ्या व्यक्तींवर दंडात्मक कार्यवाही केल्या जाईल, असे आदेशात नमूद केले आहे.

(संपादन - विवेक मेतकर)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

AUS vs IND: भारताच्या फिरकी जाळ्यात अडकले ऑस्ट्रेलियन्स! चौथा T20I जिंकून टीम इंडियाची मालिकेत आघाडी

Ausa News : अतिवृष्टीत सर्वस्व गमावलेल्या शेतकऱ्यांच्या लेकींचा उद्धव ठाकरे यांच्यासमोर टाहो

Dy Chief Minister Attacked: धक्कादायक! आधी निदर्शने, नंतर उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर हल्ला, बिहारमध्ये नेमकं काय घडलं?

Solapur Crime : बार्शीत दारु पिण्यास पैसे दिले नाहीत म्हणून डोक्यात दारुच्या बाटल्या फोडल्या. दोघांविरोधात गुन्हा दाखल!

IND A vs SA A, Test: रिषभ पंतसमोर 'तडगा' स्पर्धक! दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पठ्ठ्याचं झुंजार शतक, भारताच्या कसोटी संघासाठी ठोकला दावा

SCROLL FOR NEXT