akola news Excessive deforestation threatens bee habitat 
अकोला

बेसुमार वृक्षतोडी मुळे मधमाशांचा अधिवास धोक्यात

संतोष गिरडे

शिरपूर जैन (जि.वाशीम)  ः आयुर्वेदीक औषध शास्त्रात मधाला फार महत्त्व आहे. परंतु, औषधी गुणधर्माचा अंतर्भाव असलेले मध दिवसेंदिवस दूर्मिळ होत आहे. बेसुमार वृक्षतोडीचा परिणाम मधाच्या उत्पादनावर होत असल्याचे दिसून येत आहे. बेसुमार वृक्षतोडीमुळे झाडांची संख्या कमी झाल्याने मधमाशांचा आश्रय हिरावला जात आहे. त्यामुळे माशांना माधासाठी पोळे घालता येत नाही. परिणामी मधाचे उत्पादन दिवसेंदिवस घटत आहे.
मानवनिर्मित प्रदूषण व वृक्षतोड यामुळे मधमाशांची संख्या घटल्यामुळे, तसेच मधमाशीपालन करून मध निर्मिती उद्योगाला चालना मिळत नसल्याने, नैसर्गिक मध मिळणे कठीण झाले आहे. सर्दी खोकला सारख्या आजारावर प्राथमिक उपचार म्हणून मधाचा वापर केला जातो.

सर्वसामान्य जनतेला मिळणारे मध झाडांच्या गर्दीतून गोळा केले जाते. नैसर्गिक मध सर्वसामान्यांपासून, तर श्रीमंत लोक आवडीने खरेदी करतात. पण हे चविष्ट व बहुपोयोगी मध मिळणे दिवसेंदिवस कठीण होत आहे. वाढत्या लोकसंखे मुळे जंगले भुईसपाट होत आहेत. परिणामी दाट जंगलात वास्तव्य करणाऱ्या मधमाश्याची संख्या कमी झाली असून, याचा परिणाम या क्षेत्रातील रोजगार निर्मिती वर होत आहे, तसेच शेतामध्ये फवाण्यात येणाऱ्या कीटकनाशकांमुळे देखील मधमाशांची संख्या घटत आहे. जळाऊ लाकडासाठी जंगलातील झाडांची मोठी कत्तल केली जाते, तसेच निसर्गाचा लहरीपणा व मानवनिर्मित अडथळे यामुळे मध माशांच्या जातीही नष्ट होत आहेत. तेव्हा मधमाशांना वाचविण्याची सर्वप्रथम जंगले वाचविण्याची गरज निर्माण झाली आहे.
-------------------------
शेतीचे मोठे नुकसान
शेतात असलेल्या मधमाशाच्या वसाहतीत लाखो मधमाशा असतात. या मधमाशा परागकण गोळा करतात. यापासून पोळामधे मध तयार होते. हे पराग गोळा करताना मधमाश्या फुलावर बसतात, मधमाशाच्या पायावर लव असते या लवेला परागकण चिटकतात यामुळे नैसर्गिक परागीभवन होते. पर्यायाने पिकांमधे मोठी वाढ होते. मात्र, मधमाशा नसल्याने पिकाच्या उत्पन्नात घट होत आहे.
------------------------
कीटकनाशकांनीच घेतला बळी
शेतकरी पिकावर कीटकनाशकांची फवारणी करतात. काही कीटकनाशके धुरीजन्य, तर काही स्पर्शजन्य असतात. आता नवीन कीटकनाशकामध्ये पोटात गेल्यावर कीड किंवा अडीचे आतडे कुजून कीटकाचा मृत्यू होतो. फवारणी केल्यानंतर ही कीटकनाशके मधमाश्यांच्या पोटात जातात, त्यामुळे मधमाशाचे प्रमाण कमी होत आहे.

(संपादन - विवेक मेतकर)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan Floods: पावसाने पाकिस्तान थरथरला; मृतांची संख्या ६५० वर

Mumbai Flood: मुंबईत मुसळधार पावसाचा कहर! मिठी नदीत तरूण वाहून जाताना व्हिडिओ समोर तर एकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

Mumbai-Pune Latest Rain Live Updates Maharashtra : उजनीतून भीमा नदीत 11हजार 600 क्युसेक विसर्ग

Donald Trump: अमेरिकेत ट्रम्प यांचा थेट कारवाईचा निर्णय; रोजगार आकडेवारीवरून बीएलएस प्रमुखांना दिली हकालपट्टी

PM Modi on Indus Water Treaty : 'सिंधू जल करार'वरून नेहरूंचा उल्लेख करत पंतप्रधान मोदींचे काँग्रेसवर टीकास्त्र, म्हणाले...

SCROLL FOR NEXT