Akola News: Former Minister of State Vadettivars letter received immediately 
अकोला

माजी राज्यमंत्र्‍यांनी लिहीले वडेट्टीवारांना पत्र अन् तात्काळ मिळाले पंचनाम्याचे आदेश

शरद येवले

मंगरूळपीर (जि.वाशीम) : जिल्ह्यात ८ ते ११ ऑक्टोबर दरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याचे अतोनात नुकसान झाले.

यामुळे शेतकऱ्यावर उपासमारीची वेळ आली आहे. याबाबत माजी राज्यमंत्री सुभाष ठाकरे यांनी मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांना जिल्ह्यातील विदारक परिस्थिती मांडून जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतींचे पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी केली होती.

याबाबत मदत व पुनर्वसनमंत्री वडेट्टीवार यांनी मदत व पुनर्वसन विभागाच्या सचिवांना तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत.

सोयाबीन हे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे प्रमुख पीक आहे सोयाबीन हब म्हणून जिल्ह्याची सर्वत्र ओळख आहे. परंतु 8 ऑक्टोबर ते 11 ऑक्टोबर दरम्यान जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतामध्ये सोंगुण टाकलेली सोयाबीन, शेतात लावलेल्या सुड्याच्या गंज्या व शेतातील उभ्या पिकाचे अतोनात नुकसान झाले. यामुळे शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला असून शेतकऱ्यावर उपासमारीची वेळ आली आहे.

याबाबत माजी राज्यमंत्री सुभाष ठाकरे यांनी जिल्ह्यातील विदारक स्थितीची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री वडेट्टीवार यांच्याकडे मांडून नुकसान ग्रस्त शेतातील पिकांचे सर्वेक्षण तथा पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्याची मागणी केली होती. याबाबत मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दखल घेत तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना संबंधित विभागाच्या सचिवांना दिल्या आहेत.यामुळे माजी मंत्री सुभाष ठाकरे यांच्या प्रयत्नामुळे जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

(संपादन - विवेक मेतकर, अकोला)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL, Test : एकदिवस आधी रिटायर्ड हर्ट झाला, दुसऱ्या दिवशी फलंदाजीला उतरला... पण KL राहुलचं शतक थोडक्यात हुकलं!

Pune Restrictions: महत्त्वाची बातमी! पुण्यात १८ ते ३१ ऑगस्टपर्यंत जमावबंदी; कोणत्या गोष्टींवर असणार बंदी अन् का? जाणून घ्या...

Amit Shah: सोनिया गांधींच्या 'त्या' कृतीवर अमित शाह संतापले! चित्तोडगडमधून साधला निशाणा; म्हणाले, देशाची माफी मागा...

Nagpur Police Endlife: नागपूरमध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षकाची साडीने गळफास घेऊन जीवन संपविले; पोलिस दलात खळबळ, कारणांचा तपास सुरू

LPG Supply: स्वयंपाकाच्या गॅसवर केंद्राचा मोठा निर्णय! २१ कंपन्यांसाठी LPG उत्पादनाचा कोटा निश्चित; केंद्राची नवी रणनीती

SCROLL FOR NEXT