Akola News: Fraudulent gang nabbed by showing gold guineas 
अकोला

सोन्याच्या गिन्न्या दाखवून फसवणूक, ५ लाख ८० हजारांची पिशवी पळविली

सकाळ वृत्तसेेवा

अकोला : सोन्याच्या गिन्न्या असल्याचे भासवून फसवणूक करणाऱ्या टोळीच्या मुसक्या स्थानिक गुन्हे शाखेने २४ तासांच्या आत आवळल्यात. आरोपींना अटक केली असून, त्यांच्याकडून रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे.


मूर्तिजापूर शहर पोलिस स्टेशनला ता. २५ नोव्हेंबर रोजी सुनील महादू चासकर या पुणे जिल्ह्यातील अंबेगाव येथील ५१ वर्षीय व्यापाऱ्याने फसवणूक झाल्याची लेखी तक्रार दिली होती. त्यात आरोपी नामे संजू व गोपाल यांनी फिर्यादी व त्यांचे सहकारी यांना कमी पैशाचे मोबदल्यात सोन्याच्या गिण्या देण्याचे आमिष दाखवून नकली सोन्याच्या गिन्न्या दाखविल्याची तक्रार दिली होती.

गिन्न्या नकली असल्याचे लक्षात आल्याने फिर्यादी यांनी सदर गिण्या घेण्यास नकार दिला. तेव्हा आरोपींनी फिर्यादीस मारहाण करुन त्यांचे जवळील रोख रक्कम ५ लाख ८० हजारांची पिशवी पळवून गेली. या तक्रारीवरून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक शैलेश सपकाळ यांनी पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या आदेशाने आरोपींचा शोध घेवून २४ तासात आरोपींना अटक केली.

या गुन्ह्यात ७ आरोपीचा सहभाग असल्याचे उघडकीस आले. त्यानुसार सुनील तेजराम जाधव, सूरज मुरलीधर चौधरी, दीपक कटके (तिन्ही रा. सांगवी ता. कारंजा जि. वाशीम) यांना ताब्यात घेतले. या आरोपींनी गुन्हा केल्याचे त्यांचे साथीदारांसह केल्याची कबुली दिल्याने त्यांचेकडून गुन्ह्यातील २ लाख २० हजार ५०० रुपये रोख व गुन्हा करण्याकरिता वापरलेले वाहन महिंद्रा झायलो गाडी क्र.एमएप ३७ जी ३४९५ ताब्यात घेण्यात आली.

याशिवाय वेगवेगळया कंपनीचे चार मोबाईलही जप्त करण्यात आले. माल जप्त करून आरोपी व जप्त मुद्देमाल गुन्ह्याचे पुढील तपासकामी पो.स्टे. मूर्तिजापूर शहर यांचे ताब्यात देण्यात आला आहे.


ही करावाई पोलिस अधीक्षक श्री जी श्रीधर, अपर पोलिस अधीक्षक श्रीमती मोनिका राऊत यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक शैलेश सपकाळ, सपोनि. नितीन चव्हाण, जयंत सोनटक्के, अश्विन मिश्रा, शक्ती कांबळे, किशोर सोनोने, शेख वसिम, प्रवीण कश्यप, अविनाश मावळे व गणेश सोनोने व राहुल देवीकर सुरेश लांडे, नीलेश खंडारे, श्याम मोहाडे व सागर अकोटकर यांनी केली आहे.

(संपादन - विवेक मेतकर)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL Auction : जडेजाची कॉपी! CSKने उगाच १४ कोटी नाहीत मोजले, प्रशांत वीरचे Six एकदा बघाच... Video Viral

Prithvi Shaw : ती खोटारडी...! पृथ्वी शॉ मुंबई न्यायालयात पोहोचला, सादर केलं प्रतिज्ञापत्र; आता कोणता नवा कांड केला?

कोकाटेंच्या राजीनाम्याचा निर्णय तुम्हीच घ्या, खातं कुणाला द्यायचं सांगा; मुख्यमंत्री फडणवीसांनी अजितदादांना स्पष्टच विचारलं

Latest Marathi News Live Update : महायुतीची ठाण्यात होणार आज बैठक; जागा वाटपांवर होणार चर्चा

VIDEO : 1 मिनिट 43 सेकंदांचा Video थेट भिडतोय हृदयाला..; माकडांसाठी 'आई' बनलीये महिला, पोटच्या पोरांप्रमाणं लावतेय जीव, तुम्हीही व्हाल भावूक

SCROLL FOR NEXT