Akola News: Grain to 1.5 lakh cardholders after three months! 
अकोला

तीन महिन्यांनंतर दीड लाख कार्डधारकांना धान्य!

सुगत खाडे

अकोला  : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेल्या टाळेबंदीत एपीएल (केशरी) शिधापत्रिकाधारकांना सवलतीच्या दरात ३ किलो गहू आणि २ किलो तांदूळ प्रती व्यक्तीमागे देण्याचा निर्णय शासनाने घेतला होता.

]त्याअंतर्गत लाभार्थ्यांना जुलै महिन्याचे धान्य सवलतीच्या दरात देण्यात आले. परंतु ऑगस्ट महिन्याचे धान्य देण्यास शासनाने हात अखडता घेतला होता. दरम्यान आता कार्डधारकांना धान्य वाटप करण्याचा मार्ग मोकळा झाला असून नोव्हेंबर महिन्यात दीड लाख केशरी कार्डधारकांना धान्याचे वाटप करण्यात येईल.


एपीएल (केशरी) मधील ज्या लाभार्थ्यांना राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत तसेच १४ जिल्ह्यातील शेतकरी योजनेअंतर्गत सवलतीच्या दराने अन्नधान्याचा लाभ मिळत नाही, अशा केशरी गटातील लाभार्थ्यांना माहे मे व जून २०२० या दो महिन्यांच्या कालावधीकरिता सवलतीच्या दराने अन्नधान्याचा लाभ देण्याचा निर्णय शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने घेतला होता.

टाळेबंदीच्या काळात सदर निर्णयाचा जिल्ह्यातील लाखो लाभार्थ्यांना लाभ मिळाला. परंतु त्यानंतर मात्र शासनाने पुढील महिन्यात धान्य वाटप करण्याचे जाहीर केले नाही. दरम्यान १० जुलैरोजी शासनादेश जारी करुन केशरी शिधापत्रिकाधारकांना जुलै व ऑगस्ट महिन्यासाठी धान्य देण्याचा निर्णय जाहीर केला होता. त्याअंतर्गत एपीएल (केशरी) मधील लाभार्थ्यांना सवलतीच्या दरात गहू व तांदूळ मिळणार होते. परंतु नंतर सदर धान्य देण्यास शासनाने हात अखडता घेतल्याने लाभार्थ्यांना ऑगस्ट महिन्याच्या धान्यापासून वंचित आहेत.

अशी आहे जिल्ह्याची स्थिती
- केशरी कार्डधारक - १ लाख ४० हजार ४४४
- लाभार्थी सदस्य - ६ लाख ५ हजार ४५४
- मिळणारे धान्य - ३ किलो गहू आणि २ किलो तांदूळ (प्रती व्यक्ती)
- सवलत मूल्य - गहू ८ रुपये व तांदुळ १२ रुपये प्रतिकिलो

केशरी कार्डधारकांना जुलै महिन्याचे धान्य देण्यात आले. ऑगस्ट महिन्याचे धान्य पुढील महिन्यात देण्यात येईल. त्यासंबंधिची अंतिम कार्यवाही सुरू आहे.
- बी.यू. काळे, जिल्हा पुरवठा अधिकारी, अकोला

(संपादन - विवेक मेतकर)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RR vs CSK: सिक्स मारल्यानंतरही शिवम दुबेला कसं केलं आऊट? रवींद्र जडेजा म्हणाला, 'त्याला नेट्समध्ये गोलंदाजी केलीये, माहित होतं तो...'

RR vs CSK: वैभव सूर्यवंशीचा चेन्नईविरुद्ध झंझावात! विक्रमी अर्धशतक करत राजस्थानला मिळवून दिला 'रॉयल' विजय

लाडकी बहीण योजनेतून ७१ लाख महिला बाहेर, Ekyc साठी उरले फक्त २४ तास

IPL 2026: ७ वर्षे अन् २७७ सामने... CSK च्या बाबतीत पहिल्यांदाच घडली अशी घटना

खरात बोलतात तसं घडतं! माणिकराव कोकाटेंबद्दल तंतोतंत भविष्यवाणी केलेली; नामकर्ण आवारेंच्या पुस्तकात १३ पानं खरातवर

SCROLL FOR NEXT