Akola News: If you are walking at night in the city, be careful! Money is snatched by throwing chilli powder in the eye
Akola News: If you are walking at night in the city, be careful! Money is snatched by throwing chilli powder in the eye 
अकोला

शहरात रात्रीचे फिरत असाल तर सावधान! डोळ्यात मिरची पावडर टाकून हिसकावले जातात पैसे

सकाळ वृत्तसेवा

मंगरुळपीर (जि.वाशीम) ः दुचाकीने घरी जाणाऱ्या ४५ वर्षीय व्यक्तीस अडवून तसेच डोळ्यात मिरची पावडर टाकून १३ हजार ४०० रुपये जबरीने हिसकावून नेल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून दोन आरोपींना सोमवारी (ता. २१) च्या रात्री उशिरा अटक केली आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी प्रशांत सदाशिव झंझाड (वय ४५) रा. हुडको कॉलनी मंगरुळपीर यांनी तक्रार दिली की, ता. ११ च्या रात्री नऊ वाजता फिर्यादी हे त्यांचे दुकान बंद करून वसंतराव नाईक महाविद्यालयाचे मागून पत्रकार कॉलनी रस्त्याने घरी जात असताना मागून दुचाकीने चार जण आले.

त्यातील एकाने फिर्यादीच्या डोळ्यात मिरची पावडर टाकून जमिनीवर पाडले तर दुसऱ्याने खिशातील १३ हजार ४०० रुपये जबरीने काढून घेतले. अशा तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध भादवि नुसार गुन्हा दाखल केला.

या प्रकरणाचा तपास ठाणेदार धनंजय जगदाळे यांनी हाती घेतला. तपासात पोहेकॉं ज्ञानेश्वर राठोड, डिबी पथकाचे पोलिस कर्मचारी अमोल मुंदे, मोहम्मद परसुवाले, सचिन शिंदे, रवी वानखडे तसेच सुनील गंडाईत, मिलिंद भगत यांनी सोमवारी (ता. २१) च्या रात्री प्रकरणातील आरोपी सतिष कैलास प्रधान (वय २२) रा. मोहगव्हान ता. मंगरुळपीर व आकाश किसन मोरे (वय २७) रा. शहापूर, मंगरुळपीर यांना अटक केली. मंगळवारी (ता.२२) पोलिसांनी आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने गुरुवार (ता.२४) पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

(संपादन - विवेक मेतकर)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prajwal Revanna: "रेवन्ना प्रकरणी प्रधानमंत्र्यांनी 'त्या' पीडित महिलांची माफी मागावी"; राहुल गांधींची मागणी

Naach Ga Ghuma: बॉक्स ऑफिसवर 'नाच गं घुमा'चा धुमाकूळ; ओपनिंग-डेला केली इतकी कमाई

Fridge Tips : उन्हाळ्यात फॅनला जसा आराम देतो तसा फ्रीजलाही द्यावा का? 1-2 तास बंद ठेवला तर फायदा होतो की नुकसान?

Auto-Brewery Syndrome : एक घोटही न पिता हा माणूस असतो टल्ली.. याचं शरीरच तयार करतं अल्कोहोल! जडलाय विचित्र आजार

Latest Marathi News Live Update : अमेठी-रायबरेलीमधून राहुल-प्रियांका यांच्या उमेदवारीबाबत जयराम रमेश काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT