Akola News: Illegal traffic, ignoring corona rules
Akola News: Illegal traffic, ignoring corona rules 
अकोला

ऑटो सैराट; अवैध वाहतुकीलाही उत, कोरोना नियमांकडेही दुर्लक्ष

सकाळ वृत्तसेेवा

अकोला : एकीकडे प्रशासन कोरोना विषाणू कोविड-१९ ची दुसरी लाट थोपविण्यासाठी उपाययोजना करीत आहे. त्याचवेळी नागरिकांचा बेशिस्त पणा दुसऱ्या लाटेला निमंत्रण देत आहे. त्यामुळे दिवाळीनंतर सर्वत्र बेलगाम झालेली वाहतूक रस्त्यावर बघावयास मिळत आहे.

त्यात बेशिस्त ऑटोचालक आणि अवैध वाहतुकीचा उत आला असून, शहरासह जिल्ह्यातील वाहतुकीचा बोजवारा उडाला आहे. यंत्रणांनाही हे अवैध वाहतुकदार जुमानत नसल्याची स्थिती आहे.


अकोला शहरातील मुख्य रस्ता असलेल्या अशोक वाटिका ते रेल्वे स्थानकादरम्यान उड्डाण पुलाचे काम सुरू आहे. याच रस्त्याने शहरातील ६० टक्के वाहतूक सुरू असते. शहरातील ६० टक्केपेक्षा अधिक ऑटोही याच रस्त्यावर धावतात. अकोटककडे जाणारा राज्य मार्ग असल्याने व कृषी उत्पन्न बाजार समिती, रेल्वे मालधक्काही याच मार्गावर असल्याने जड वाहतुकही सुरू असते.

हेही वाचा - अरे बापरे!  प्राचार्यांनीच केली प्राध्यापिकेला शरीरसुखाची मागणी

याच मार्गावर दोन्ही बस स्थानक आहे. प्रमुख हॉटेल व शाळा, मंगल कार्यालयेही याच रस्त्यावर आहेत. त्यामुळे दररोज या रस्त्यावर वाहतुकीची कोंडी होताना दिसते. त्याला नियंत्रित करणारी यंत्रणा गुंतलेली बघून अवैध वाहतुकदारांनी आपला मोर्चा शहराच्या मध्यवर्ती भागातील या रस्त्याच्या बाजूने असलेल्या उपरस्त्यांकडे वळविला आहे.

बस स्थानकाच्या बाजूला असलेल्या निंबोळ्या गल्लीतून ट्रॅव्हल्स सारखी खासगी बस वाहने दररोज धावत असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. बस स्थानकातून बाहेर पडणारी वाहतूक आणि अवैध वाहतूक यामुळे या मार्गावर नेहमीच वाहतूक कोंडी होताना दिसत आहे.

हेही वाचा - शिक्षक मतदारसंघ: सर्वच समस्यांना अचानक फुटले तोड, निवडणूकीच्या रणधुमाळीत प्रत्येकाचा दावा

आता थेट बस स्थानकापासूनच प्रवाशी वाहतूक
अकोला शहरात सन २००० पूर्वी रुंगठा पेट्रोल पंपावरून वाशीम, यवतमाळ, अमरावतीसाठी खासगी बस सुटत होत्या. कालांतराने ते बंद झाले. त्यानंतर निमवाडी पोलिस मुख्यालयासमोर खासगी बसला परवानीग देण्यात आली होती. तेव्हा बस स्थानकाजवळ खासगी बसवाले स्वतःच्या वाहनाने प्रवाशांना निमवाडी येथे सोडायचे. आता तीन-चार महिन्यांपासून थेट बस स्थानकापासूनच खासगी बसवाले प्रवाशी वाहतूक करीत आहे.

परवानगीशिवाय सुरू आहे वाहतूक
बस स्थानकाच्या बाजूला असलेल्या गल्लीतून अवैध वाहतूक करणारी वाहणे कोणत्याही परवानगी शिवाय धावत आहेत. येथे जागा नसतानाही गल्लीबोळ्यातून बस या गल्लीत थांबवून प्रवाशी बसवून घेतले जात आहे. कोविड-१९ बाबतचे कोणतेही नियम पाळताना दिसत नाही.

हेही वाचा - कार्तिकस्वामींचे  एकमेव मंदीर मूर्तिजापूर येथे 

कारवाई सुरू
वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलिस निरीक्षक गजानन शेळके यांना या अवैध वाहतुकीबाबत विचारणा केली असता खासगी बसना येथे प्रवाशी बसविण्याबाबत कोणतीही परवानगी दिली नसल्याचे त्यांनी सांगितले. येथे उभ्या करण्यात येत असलेल्या खासगी बसवर कारवाई सुरू करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

रस्ता सुरक्षा समितीच्या शिफारशी दुर्लक्षित
अकोला शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी रस्ता सुरक्षा समितीने जिल्हा प्रशासन व महानगरपालिका प्रशासनाकडे शिफारशी केल्या आहेत. मात्र त्याबाबत अद्यापही महानगरपालिका प्रशासनाकडून गांभिर्याने उपाययोजना करण्यात येताना दिसत नाही.

हेही वाचा - प्रलोभणे दाखवून व्यभिचार करीत सत्तेत येण्याचा भाजपचा प्रयत्न - जयंत पाटील

ऑटो थांब्यासाठी २० जागांची शिफारस
अकोला शहरातील वाहतुकीच्या बोजवारा उडविण्यात क्षमतेपेक्षा चारपट अधिक असलेल्या ऑटोंची संख्या प्रामुख्याने कारणाभूत आहे. शहरात दीड हजार ऑटोची क्षमता असताना सात हजारांवर अधिक ऑटो शहरात धावतायेत आहेत. त्यामुळे वाहुतीकाची कोंडी होताना दिसते. त्यासाठी अकोला शहर वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक गजानन शेळके यांनी शहरात २० ऑटो थांब्यांची शिफारस केली आहे. त्याची परवानगी मिळावी म्हणून ते जून २०२० पासून महानगरपालिकेकडे पाठपुरवाही करीत आहे.

या जागांची केली शिफारस
-धिंग्रा चौक ते पोस्ट ऑफिस उड्डाणपुलाखाली
-टॉवर चौक ते स्टेट बँकपर्यंत उड्डाणपुलाखाली
-वाशीम बायपास जुने शहराकडे जाणारा रस्ता
- लक्झरी बस स्थानक
-जेल चौक
-सिंधी कॅम्प
-गांधी चौक,
-सिटी कौतवाली
-ओपन थिएटर
-जिल्हा रुग्णालय
-लेडी हार्डिंग
-कौलखेड चौक
-हिंगणा फाटा
-जठारपेठ चौक
-रेल्वे स्टेशन चौक
-जिल्हाधिकारी कार्यालय
- मनपा चौक
- संत तुकाराम चौक
- जवाहरनगर चौक
- बियाणी चौक

हेही वाचा - आत्महत्येच्या प्रयत्नांनंतर शेतकऱ्यांना मिळणार भूसंपादनाचा वाढीव मोबदला

-ऑटो सँड संदर्भात जूनपासून पाठपुरावा सुरू आहे. एसपी साहेब यांचे सहीचे पत्र सुद्धा दिले. चार दिवसांपूर्वी प्रत्यक्ष मनपा आयुक्तांना भेटून माहिती दिली. ऑटो स्टँड मिळाले तर ऑटोवाल्यांना काही प्रमाणात का होईना शिस्त लावण्यासाठी मदत होईल. ऑटो स्टँड शिवाय उभे राहणारे ऑटो चालान करता येतील.
- गजानन शेळके, पोलिस निरीक्षक, वाहतूक शाखा, अकोला

(संपादन - विवेक मेतकर)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Loksabha election : ...म्हणून ओमराजे निंबाळकर शिंदेंसोबत गेले नाहीत; 'सकाळ'च्या खास मुलाखतीत केला खुलासा

T20 World Cup 2024: BCCI निवड समितीची जय शाह यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बैठक! टीम इंडियाची घोषणा कधी? अपडेट्स आल्या समोर

Patanjali Products Ban: पतंजलीच्या 14 औषधांवर उत्तराखंडमध्ये बंदी! सुप्रीम कोर्टानं फटकारल्याचा परिणाम

Loksabha election 2024 : बेटों के सम्मान में, 'मर्द' उतरे मैदान मे! ना विजयाची चिंता ना प्रचाराची फिकीर; पुरुषांच्या हक्कासाठी निवडणुकीच्या मैदानात

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT