Akola News: ITI starts, but ST travel concessions closed, rural students robbed by private vehicle owners 
अकोला

आयटीआय सुरू, पण एसटी प्रवास सवलत बंद, ग्रामीण विद्यार्थ्यांची खासगी वाहनधारकांकडून लुट

सकाळ वृत्तसेेवा

अकोला :  शासनाने औद्यागिक प्रशिक्षण संस्थांच्या (आयटीआय) प्रशिक्षण वर्गाना परवानगी दिली. परंतु, एसटीकडून विद्यार्थ्यांना प्रवासात मिळणाऱ्या सवलती सुरू न झाल्याने व अनेक भागात अद्यापही बस सेवा न सल्याने खासगी वाहनधारकांकडून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची आर्थिक लुट सुरू आहे.


कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने मार्चमध्ये लाॅकडाउनची घोषणा केली होती. त्यानुसार देशभरातील शैक्षणिक संस्था बंद करण्यात आल्या होत्या. अनलॉक ५ मध्ये गेल्या ७ महिन्यापासून बंद असलेल्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थांच्या प्रशिक्षण वर्गाना मंजुरी देण्यात आली आहे. त्या अनुषगाने आयटीआयमध्ये प्रशिक्षणार्थी येण्यास सुरुवात झाली आहे.

परंतु, विद्यार्थ्याना एसटी बसमध्ये मिळणाऱ्या सवलती सुरू न झाल्याने बाहेर गावाहून येणाऱ्या विद्यार्थ्यांना आर्थिक फटका बसत आहे. लाॅकडाउन पूर्वी एसटी पेक्षा कमी दर असल्याने व अनेक गावांमध्ये बस थांबत नसल्याने विद्यार्थी खासगी वाहनाने प्रवास करीत होते.

खासगी वाहनाचे भाडे २० ते ३० रुपयांनी वाढले असल्याने प्रशिक्षणासाठी संस्थेत कसे यावे असा प्रश्न विद्यार्थ्यांसमोर उपस्थित झाला आहे. यामुळे एसटी बसमधे विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या सवलती पुन्हा सुरू कराव्या, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून होत आहे.

(संपादन - विवेक मेतकर)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT