Akola News: Kartikswamys only temple at Murtijapur  
अकोला

कार्तिकस्वामींचे  एकमेव मंदीर मूर्तिजापूर येथे

सकाळ वृत्तसेेवा

मूर्तिजापूर(जि.अकोला)  : कार्तिक महिन्यातील कृतिका नक्षत्रात कार्तिक स्वामींच्या दर्शनाचे महत्व अनन्यसाधारण असून महिलांना वर्षभरात केवळ या पर्वावरच दर्शनाचा लाभ मिळतो, अशा कार्तिकस्वामींचे जिल्ह्यातील एकमेव मंदीर येथे आहे व हा योग यंदा रविवारी (ता.२९) येत आहे.


स्व. श्रीमंत विठ्ठलराव जमादार यांनी समर्थ रामदासांच्या दासबोधातील मंदीरांचा जिर्णोद्धार करण्याच्या बोधामृताने प्रेरीत होऊन या परीसरात मंदिरे उभारली व असंख्य मंदिरांचा जिर्णोद्धार केला आणि विशेष म्हणजे स्वतःच्या नावाची कुठेच नोंद ठेवली नाही.

त्यापैकी एक येथील जुनी वस्ती देवरण रस्त्यावरील माजी नगराध्यक्ष दादासाहेब जमादार यांच्या शेतातील मार्कण्डेश्वर आहे. या मंदिराच्या तळभागात भगवान कार्तिकेय स्वामीची सव्वाफूट उंचीची पाढारीशुभ्र सुरेख व सुंदर संगमरवरी षण्मुखी मूर्ती आहे. दरवर्षी पोर्णिमेला व कृतिका नक्षत्रात हजारो च्या संख्येने भाविक आंध्रप्रदेश, मध्य प्रदेश व महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातुन भाविक दर्शनासाठी येतात.

यावर्षी या कार्तिक स्वामींच्या दर्शनाचा योग रविवारी (ता.२९) येत आहे. हे धार्मिक स्थळ कानपुरचे नागा निर्वाण महाराज, अक्कलकोटचे श्री.स्वामी समर्थ महाराजांच्या व्यासपीठावर विराजमान चतुर्थ महाराज पुरुष श्री.गजानन महाराज, चिखलीचे संत मौनीबाबा, मूर्तिजापुरचे संत बद्रीनाथ महाराज आदींच्या सहवासाने पावन झालेले आहे. या ठिकाणी मार्कण्डेश्वर मंदिरात शिवलींग व त्याला घट्ट मिठी मारून शरणागत बाल मार्कण्डेय ऋषीची संगमरमरी मूर्ती आहे. समोरच यमराज देवतेची काळ्या पाषाणाची मूर्ती आहे.

हा संपूर्ण परीसर निसर्गम्य व आधात्मिक लहरींनी भारलेला असून येथे प.पु.बद्रीबाबा महाराज,प.पु.बँक बाबा महाराज, श्री.बलदेव महाराज, वैध महाराज आदी संताची समाधी आहे. यावर्षी कार्तिक पौर्णिमा ता.३० नोव्हेंबर आहे; परंतु भगवान कार्तिकेय दर्शनासाठी मुहूर्त रविवारचा (ता.२९) आहे. रविवारी कृतिका नक्षत्रात दिवसभर मंदिर दर्शनासाठी उघडे राहील.संध्याकाळी 7 नंतर मंदिर बंद करण्यात येईल. तरी जास्तीत जास्त भावीक भक्ततांनी हजारो च्या संख्येने उपस्थित राहून दर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन माजी नगराध्यक्ष दादासाहेब जमादार, मनिष जमादार, निशांत जमादार, ॲड.भारत जमादार यांनी केले आहे.

हेही वाचा - पावसाचा इशारा अन् थंडीची लाट

वर्षभर असते महिलांना दर्शनाची बंदी
कार्तिक महिन्यातील कृतिका नक्षत्र वगळल्यास वर्षभर महिलांना मंदीर प्रवेश निषिद्ध असतो, त्याबाबत दादासाहेब जमादारांनी पौराणिक संकेतांकडे अंगुलीनिर्देश केला. गणेशाची प्रकृती अध्यात्मिक, तर कार्तिकेयाची वैज्ञानिक. शंकर पार्वती या माता-पित्यांना प्रदक्षिणा घालणाऱ्या गणेशाने स्वतःचा, तर कार्तिकेयाने ब्रम्हांडाला प्रदक्षिणा घालून आधी ब्रम्हांडाचा शोध घेतला, असे तर्कसंगत विश्लेषणही त्यांनी केले.

(संपादन - विवेक मेतकर)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shivaji Maharaj: शिवरायांच्या काळातील गणपती मूर्ती प्रकट; जिजाऊंनी बांधलेले मंदिर, १५व्या शतकातील बाप्पांचं मूळ स्वरूप पहा

Latest Marathi News Update : पुण्यात थंडीसोबत धुकेही वाढले, तीन विमानांची उड्डाणे रद्द

Pune : भाजपचा माजी नगरसेवकांना धक्का, ४२ जणांचं तिकीट कापलं; नेत्यांच्या मुलांनाही नाकारली उमेदवारी, पाहा यादी

Hardik Pandya: वन डे मालिकेतून हार्दिक पंड्याला विश्रांती?; भारतीय संघाची घोषणा ३ किंवा ४ जानेवारीला हाेणार!

Varanasi New Year 2026 : नवीन वर्षाआधीच काशी 'हाउसफुल'; दर्शनासाठी येण्यापूर्वी ही नियमावली नक्की वाचा, अन्यथा होईल मनस्ताप

SCROLL FOR NEXT