Akola News: Luxury slipped from the mound; Two-wheeler accident at the same place 
अकोला

मातीच्या ढिगाऱ्यावरून घसरली लक्झरी; त्याच ठिकाणी दुचाकीलाही अपघात

दीपक पवार

कारंजा लाड (जि. वाशीम) ः  मातीच्या ढिगाऱ्यावरून लक्झरी घसरल्याने झालेल्या अपघातात बस खाली दबून एकाचा जागीच मृत्यू झाला. त्यामागून येणारी दुचाकीही त्याच मातीच्या ढिगाऱ्यावरून घसरल्याने दुचाकीस्वारही ठार झाल्याची घटना ता. २९ सप्टेंबर रोजी घडली. कारंजा-अमरावती मार्गावरील टाकळी फाट्यानजिक पहाटे ३ ते ४ वाजताच्या दरम्यान हा विचित्र अपघात घडला.


प्राप्त माहितीनुसार, एम. एच. २८ ई एल ४१०० क्रमांकाची लक्झरी बस औरंगाबादवरून नागपूरकडे जात असतांना मार्गातील टाकळी फाट्यानजीक रस्त्याच्या मधोमध कंत्राटदाराने टाकलेल्या मातीच्या ढिगाऱ्यावरून घसरली.

या अपघातात अमोल जोगेश खंडारे (वय २१) हा नागपूर येथील युवक हा लक्झरीखाली दबल्याने जागीच ठार झाला. बसमधील चेतना रमेश भगत, प्रशांत चैनलाल काळे, संदिप विनोद टेकाम, सीमा नितीन गवई व चेतना नितीन गवई असे पाचजण गंभीर जखमी झाले.

या घटनेनंतर काही क्षणातच एम एच २७ ए टी ५७०३ क्रमांकाची दुचाकी याच मार्गाने जात असताना त्या मातीच्या ढिगाऱ्यावरून घसरली. दुचाकीवरील मागे बसलेल्या प्रभाकर चंद्रभान वाघ (वय ५०) रा. शेंदुरजुना खु. ता. धामनगाव जि. अमरावती यांचा दुचाकीवरून खाली पडल्याने जागीच मृत्यू झाला.

या दुचाकीवरील दोघेजण पंढरपूरहून अमरावतीकडे जात होते. घटनेची माहिती मिळताच धनज पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून जखमींना प्राथमिक उपचारासाठी कामरगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.

कंत्राटदाराच्या चुकीने गेले दोन बळी
मागील काही दिवसांपासून कारंजा-अमरावती मार्गाच्या रूंदीकरणाचे व काॅंक्रिटीकरणाचे काम हैदराबाद येथील आर. आर. कन्स्ट्रक्शनच्या वतीने सुरू आहे. हे काम करतांना संबंधित कंत्राटदाराने रस्त्याच्या मधोमध मातीचा ढिगारा टाकल्याने उपरोक्त दोन्ही अपघात घडले आहे. या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे सूचनाफलक लावण्यात आले नाही.

यापूर्वी देखील याच मार्गावर कंत्राटदाराच्या चुकीमुळे झालेल्या अपघातात चार जणांचा बळी गेला होता. एकीकडे रस्तेविकास महामंडळाच्या वतीने प्रवाशांच्या सोयीसाठी रस्ते बनविले जात आहे तर दुसरीकडे याच रस्त्यासाठी कंत्राटदाराच्या चुकीमुळे सर्वसामान्यांचा बळी दिल्या जात आहे. त्यामुळे संबंधित कंत्राटदारावर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

(संपादन - विवेक मेतकर)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gokul Chairman Election : 13-12 चं गणित अन् 14 चा नियम! 'गोकुळ'च्या अध्यक्ष निवडीतील कायदेशीर पेचावर प्रकाश आबिटकरांचं मोठं विधान; म्हणाले, 'केवळ मनाच्या समाधानासाठी...'

Mumbai Local: महिन्याच्या पहिल्याच दिवशी लोकलचं वेळापत्रक कोलमडणार! अनेक गाड्यांच्या मार्गात बदल, काही ट्रेन रद्द; पाहा वेळापत्रक

Marathi News Live Updates : भारतीय संघाचा UAE कडून ६ गडी राखून पराभव; पाकिस्ताननंतर सलग दुसरा धक्का!

Gold Price Today: सोनं-चांदीचे भाव कोसळले! 2 दिवसांत सोनं 51,000 रुपयांनी स्वस्त; 10 महिन्यांत सर्वात स्वस्त दर, पाहा ताजा भाव

वाल्मिक कराडच्या मुलासह तिघांविरोधात गुन्हा दाखल, महिलेला मारहाणीचा आरोप; विनयभंगासह POCSO कलमाअंतर्गत गुन्हा

SCROLL FOR NEXT