Akola News: Mahabeej retired employees go on chain strike from Tuesday 
अकोला

महाबीज सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे मंगळवारपासून साखळी उपोषण

सकाळ वृत्तसेेवा

अकोला : प्रलंबित विविध मागण्याकरिता ८ डिसेंबरपासून महाबीज सेवानिवृत्त कर्मचारी साखळी उपोषण व आंदोलन करणार आहेत.


महाराष्ट्र शासनाने २०१६ पासून सातवा वेतन लागू केला आहे. जानेवारी २०१६ नंतर सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाची रक्कम देय असून, ती अदा करण्यात यावी. महाबीजने १२ वर्षे सेवा झालेल्या कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र शासनाप्रमाणे आश्‍वासीत प्रगती योजना लागू केली होती.

परंतु, २४ वर्ष सेवेचा लाभ लागू केला नाही व आश्‍वासीत प्रगती योजना कर्मचाऱ्यांना देणे बंद केले. ती सुरू करून दोन्ही योजनेचा लाभ सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना देण्यात यावा. महाबीज संचालक मंडळाने २०१२-१३ ते २०१७-१८ असे सानुग्रह अनुदान मंजूर केले.

परंतु, त्यापैकी तीन वर्षाचे अनुदान अद्यापपावेतो देण्यात आलेले नाही. हा प्रश्‍न निकाली काढावा. समान पद समान वेतन लागू न केल्यामुळे कनिष्ठ प्र.सहा., प्र.सहा., शिपाई, ड्रायव्हर या कर्मचाऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. ती मागणी मंजूर करून सेवानिवृत्तांना न्याय द्यावा, अशा मागण्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या आहेत.

(संपादन - विवेक मेतकर)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Surendra Koli : निठारी प्रकरणात निर्दोष मुक्त सुरेंद्र कोलीने जीवन संपवले; २१ वर्षांच्या तुरुंगवासानंतर पुन्हा सुरू केले होते सामान्य आयुष्य

६ वर्षांपासून क्लार्क, पण टायपिंग टेस्टमध्ये तीनदा फेल; जिल्हाधिकाऱ्यांनी डिमोशन करत शिपाई बनवलं

Pune Bus Blaze: शिवाजीनगर चौकात पीएमपी बसला अचानक आग; अग्निशामक जवानाच्या सतर्कतेने प्रवाशांचे प्राण वाचले

Pune Illegal PG Hostels : लोहगावमध्ये ११ बेकायदेशीर पीजी हॉस्टेल सील; विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालणाऱ्या जागामालकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

Gambling Raid : गंगापूरमध्ये रम्मी जुगार अड्ड्यावर धाड; १.९२ लाखांचा मुद्देमाल जप्त, तिघांसह चौघांवर गुन्हा

SCROLL FOR NEXT