Akola News: Mahabeejs laboratory honored with Best Seed Testing 
अकोला

महाबीजच्या प्रयोगशाळेला ‘बेस्ट सीड टेस्टिंग’चा बहुमान

अनुप ताले

अकोला :  महाबीजच्या अकोला येथील गुणवत्ता नियंत्रण प्रयोगशाळेस, ॲग्रीकल्चर टुडे दिल्ली या समुहातर्फे ‘बेस्ट सीड टेस्टिंग लॅब इन पब्लिक सेक्टर’चा राष्ट्रीय स्तरावरील बहुमान नुकताच जाहीर झाला आहे.


कृषी क्षेत्रात काम करणाऱ्या शासकीय/निमशासकीय तसेच खासगी कंपन्यांकडून विविध घटकांवर काम करणाऱ्या बाबींवर नामांकन मागविण्यात आले होते.

तद्नंतर प्राप्त नामांकनमधून तज्ज्ञ निवड समितीच्या वतीने प्राप्त झालेल्या सादरीकरणाचा सर्वांगिण अभ्यास करून घटक निहाय पुरस्कार घोषित करण्यात आले. त्यामध्ये उपरोक्त पुरस्कारासाठी महाबीजची निवड केली.

महाबीजच्या गुणवत्ता नियंत्रण प्रयोगशाळेस यापूर्वीच महाराष्ट्र शासनाने बियाणे अधिनियम १९६६ नुसार अधिसूचित केल्यामुळे ‘राज्य बियाणे प्रयोगशाळा’ म्हणून घोषित केले आहे. त्याप्रमाणे आयएसटीए या आंतररष्ट्रीय संस्थेचे सुद्धा सन २०१८ पासून सभासदत्व प्राप्त झाले असून, आयएसटीए ॲक्रीडेशनची प्रक्रिया प्रगतीपथावर आहे.

महाबीजच्या प्रयोगशाळेस हा बहुमान मिळण्यामागे कुशल तांत्रिक मनुष्यबळ, अद्यावत उपकरणे तसेच तंत्रज्ञानाचा वापर, गुणवत्ता अंकेक्षण, प्रोफेसिअन्सी टेस्टमध्ये सलग समाधानकारक कामगिरी, उपकरणांचे प्रमाणीकरण इत्यादी बाबींचा प्रामुख्याने सहभाग असल्याचे महाबीज प्रशासनाकडून सांगण्यात आले.

(संपादन - विवेक मेतकर)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Buldhana Violence : बुलढाण्यात २ गटात राडा! तलवार अन् शस्त्रांनी वार; शिवसेना नगरसेवकासह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याचा मृत्यू, ७ जण जखमी

Leopard : दुष्काळात तेरावा महिना, भेंडाळा शिवारात बिबट्याच्या हल्ल्याचे सत्र सुरूच; पिंजरा लावण्याची मागणी

Phulambri News : तावडे केणेकरांच्या घरी, चव्हाण भाजप कार्यालयात..! पदवीधरच्या राजकारणात नेमके चाललेय तरी काय?

Mangalwedha News : दिल्लीच्या सीमेवर पंढरपूर मंगळवेढ्याच्या शेतकऱ्यांना रोखले; गनिमी पद्धतीने जंतर-मंतरवर धडक, मागण्यांसाठी आंदोलन

भारत-अमेरिका व्यापार कराराची चर्चा ठप्प! अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं कारण

SCROLL FOR NEXT