Akola News: MNS engine to enter Gram Panchayat elections! 
अकोला

ग्रामपंचायत निवडणुकीत प्रवेश करणार मनसेचे इंजिन!, इच्छुकांच्या मुलाखती आटोपल्या

सकाळ वृत्तसेेवा

अकोला : जिल्ह्यातील २२५ ग्रामपंचायतींसाठी १५ जानेवारी रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनाही (मनसे) उतणार आहे. त्यासाठी शनिवारी (ता. २०) ९० पेक्षा जास्त इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. ग्राम पंचायत निवडणुकीच्या निमित्ताने मनसेचे इंजिन आता ग्रामीण भागात प्रवेश करणार असल्याने त्याचा फटका काेणत्या राजकीय पक्षाला बसेल, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

जिल्ह्यातील डिसेंबर २०२० अखेर मुदत संपणाऱ्या व नव्याने स्थापित होणाऱ्या २२५ ग्रामपंचायतींसाठी राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. त्याअंतर्गत संबंधित ग्रामपंचायतींमध्ये १५ जानेवारी रोजी मतदान तर १८ जानेवारी रोजी मतमोजणी होणार आहे.

निवडणूक कार्यक्रमाअंतर्गत बुधवार (ता. २३) पासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होणार असून इच्छुक ३० डिसेंबर उमेदवारी अर्ज दाखल करु शकतील. त्यामुळे राजकीय पक्षांच्या मोर्चे बांधणीला वेग आला असून विविध राजकीय पक्षांनी उमेदवार उतरवण्याची तयारी केली आहे.

दरम्यान या निवडणुकीत मनसे सुद्धा उतरणार असल्याची माहिती मनसेचे जिल्हाध्यक्ष पंकज साबळे यांनी दिली आहे. त्यासाठी ९० पेक्षा जास्त इच्छुकांनी मुलाखती दिल्या. अनेक जण उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आवश्यक असलेली दस्तावेजांचे संकलन करीत आहेत. जास्तीत-जास्त ठिकाणी उमेदवार उभे करण्यात येणार आहेत.

(संपादन - विवेक मेतकर)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dagdusheth Ganpati: भक्तांच्या श्रद्धेला मानाचा मुकुट; दगडूशेठ गणपती संस्थानाला ‘अ’ वर्ग पर्यटन क्षेत्राचा दर्जा!

PBKS vs RCB: बंगळुरूने मिळवलं IPL 2026 प्लेऑफचं तिकीट; पंजाबचा सलग ६ व्या पराभवामुळे CSK, RR चा झाला फायदा

Dhule-Solapur Highway: रजापूर उड्डाण पुलाखाली सिमेंट मिक्सर अडकला; दोन तास वाहतूक ठप्प

Severe Water Crisis: आडूळ परिसरात भीषण पाणीटंचाई; मोसंबी, डाळिंब, आंबा बागा सुकल्या, शेतकऱ्यांवर फळबागा तोडण्याची वेळ

DC vs RR: राजस्थानने जडेजाला Playing XI मधून बाहेर का काढलं? कर्णधारानं सांगितलं कारण; दिल्लीकडून Tripurana Vijay ला पदार्णाची संधी

SCROLL FOR NEXT