akola news Morning walkers were crushed by an unknown vehicle 
अकोला

सोमवार ठरला अपघात वार, मॉर्निंग वॉक करणाऱ्यांना अज्ञात वाहनाने चिरडले

सकाळ वृत्तसेेवा

हिवरखेड (जि.अकोला)  ः सोमवार, ता. ५ एप्रिल हा हिवरखेडसाठी अपघात वार ठरला. मॉर्निंग वॉक करणाऱ्या काही व्यक्तींना अज्ञात वाहनाने चिरडले. यामध्ये एका महिलेचा मृत्यू झाला तर इतर तीन जखमी झाले. दुसऱ्या अपघातात मारुती इको या गाडीने एका महिलेला धडक मारली असून, त्यामध्ये फहमीदा बी ही महिला जखमी झाली आहे.


सोमवार रोजी पहाटे साडे ५ वाजताच्या दरम्यान आकोट- हिवरखेड- जळगाव जामोद राज्यमार्ग क्रमांक ४७ वर (लालाजी नगर) खरेदी विक्री कार्यालयासमोर उषा जयराम गिऱ्हे, वर्षा भुडके, सचिन वसानी, वर्षा वसानी, प्रशिका वसानी, कल्याणी गिऱ्हे हे सहा जण रस्त्याच्या कडेला मॉर्निंगवॉक करीत होते.

त्यापैकी कुमारी कल्याणी गिऱ्हे आणि कुमारी प्रशिका वसानी या दोन मुली जॉगिंग करण्यासाठी थोड्या पुढे गेल्या होत्या. त्यामुळे त्या थोडक्यात बचावल्या. तेवढ्यातच अकोटकडून सोनाळाकडे भरधाव जाणाऱ्या एका अज्ञात चारचाकी वाहनाने मागे राहिलेल्या चौघांना चिरडून पोबारा केला. त्यामुळे सकाळच्या निरव शांततेत जखमींच्या किरकाळ्यांचा वेदनादाई आवाजाने आसमंत दनाणला. सदर परिसर निर्मनुष्य असल्याने याचा फायदा घेत गंभीर जखमींना कोणतीही मदत न करता संवेदनहीन अज्ञात वाहनधारकाने तेथून वाहनासह सोनाळा रस्त्याने पळ काढला. काही अंतरावरच सकाळी व्यायाम करत असणाऱ्या काही युवकांनी त्या वाहनाचा पाठलाग केला. परंतु सदर वाहनचालक हाती सापडला नाही.

नंतर प्रशिका वसानीने या घटनेची माहिती त्यांचे नातेवाईक किरण सेदानी आणि जितेश कारिया यांना फोन करून दिली. त्यामुळे त्यांनी तत्काळ घटनास्थळी पोहोचत १०८ रुग्णवाहिकेसाठी फोन केले. परंतु हिवरखेड येथे १०८ रुग्णवाहिका नेहमीप्रमाणे हजर नसल्याने अकोटवरून रुग्णवाहिका येण्यास एक तास लागेल असे उत्तर मिळाले. त्यामुळे गावातील गजानन दाभाडे, संदीप गांधी, अक्षय वानखडे, इत्यादींनी आप-आपल्या वाहनातून जखमींना रुग्णालयात हलविण्यासाठी पुढाकार घेतला. यावेळी व्यायाम करणारे अनेक युवक, सरपंचपती संतोष राऊत आणि अनेक गावकऱ्यासह जागरूक नागरिकांनी घटनास्थळावर धाव घेत जखमींची मदत करून माणुसकीचा परिचय दिला. जखमींना अकोट येथे नेत असताना उषा जयराम गिऱ्हे (वय अंदाजे ३८ वर्षे) या युवतीचा वाटेतच दुर्दैवी मृत्यू झाला. नंतर मृतकाचे शवविच्छेदन करण्यात आले. संध्याकाळी शोकाकुल वातावरणात तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. सौ वर्षा भुडके, सौ वर्षा वसानी, सचिन वसानी हे तीन जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. ह्या घटनेने सर्वत्र शोककळा पसरली आहे.
............
सीसीटीव्ही फुटेजमधून लागणार वाहनाचा पत्ता
इतक्या जणांना चिरडून गेल्यावर हा वाहनधारक कुणी आपला पाठलाग करून पकडेल या भीतीने भरधाव जात असताना सौंदळा आणि सोनाळा येथील रस्त्याजवळ लोकांना सुद्धा चिरडण्याचा त्याने प्रयत्न केला अशा प्रकारची माहिती सुद्धा सोशल मीडियावर फिरत होती. त्यामुळे पोलिसांनी परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासून तत्काळ या वाहन चालकाचा शोध घेऊन त्याला तत्काळ अटक करावी, अशी मागणी संतप्त गावकरी करीत आहेत.

(संपादन - विवेक मेतकर)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

SCROLL FOR NEXT